जामखेड प्रमाणे श्रीगोंद्यालाही कृषी महाविद्यालय होणार,मुख्यमंत्र्यांच्या घोषणेचे स्वागत.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :जामखेडप्रमाणे श्रीगोंद्यालाही कृषी महाविद्यालय होणार असल्याची घोषणा हळगाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषी महाविद्यालयाच्या भूमिपूजन समारंभ प्रसंगी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे. या कार्यक्रमासाठी पालकमंत्री प्रा.राम शिंदे, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खा. दिलीप गांधी, आ. शिवाजीराव कर्डिले, राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा हे उपस्थित होते. या घोषणेचे श्रीगोंदे तालुक्याच्यावतीने आम्ही मुख्यमंत्र्यांचे स्वागत करतो. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रा. तुकाराम दरेकर यांनी व्यक्त केली आहे.


----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
प्रा. दरेकर म्हणाले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने शासन सुरु करीत असलेल्या हळगाव येथील कृषी महाविद्यालयाला श्रीगोंदे तालुक्याचा विरोध नव्हता आणि नाही. परंतु श्रीगोन्द्याचा प्रस्ताव जून २०१५ मधील म्हणजे तीन महिने अगोदरचा असतांना तसेच श्रीगोंदा या ठिकाणी महाराष्ट्र शासनाची ४६६ एकर जमीन , शासनाने १९८० साली बांधून ठेवलेली २ कोटी रुपयांची रिकामी असलेली इमारत, औटेवाडी तलावातील पाणी व्यवस्था, कुकडी प्रकल्पाच्या मोकळ्या असलेल्या निवासी खोल्या उपलब्ध असल्याने जून २०१५ मध्ये आलेली पाहणी समिती श्रीगोंद्याच्या प्रस्तावावर खूष होती. हा प्रस्ताव चांगला असल्याचे त्यांनी मान्यही केले होते.

मात्र नंतर तीन महिन्याने म्हणजे सप्टेबर २०१५ मध्ये हळगावाचा प्रस्ताव दाखल करून त्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याने श्रीगोंदे तालुक्यात अन्यायाची भावना तयार झाली होती. हळगावला कृषी महाविद्यालय देण्यास श्रीगोन्द्याचा विरोध नव्हता, हळगाव प्रमाणे श्रीगोन्द्यालाही कृषी महाविद्यालय द्यावे कारण दोन महाविद्यालयात ५० कि.मी.पेक्षा जास्त अंतर असले पाहिजे आणि हळगाव व श्रीगोंदा या दोन ठिकाणामध्ये ७० कि.मी. पेक्षा जास्त अंतर आहे. ही श्रीगोंदे करांची मागणी होती.आणि न्यायासाठी औरंगाबाद उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती.

अहिल्यादेवीच्या नावाने सुरु केल्या जाणा-या कृषी महाविद्यालयाला विरोध करू नये अशी मुख्यमंत्र्यांची अपेक्षा होती व ती आम्हालाही मान्य होती. तथापि हळगाव प्रमाणे श्रीगोन्द्याला पूर्ण कृषी आणि शासकीय कृषी महाविद्यालय देऊन श्रीगोंदे तालुक्यावरील अन्याय शासनाने दूर करावा , अशी श्रीगोंदे तालुक्याची इच्छा आहे. मुख्यमंत्र्यांनी ही इच्छा पूर्ण केल्यास जनहित याचिकेचा पाठपुरावा करण्याची वेळ आमच्यावर येणार नाही, असेही प्रा. दरेकर म्हणाले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.