कोठला परिसरात अवैध कत्तलखान्यावर छापा,८०० किलो गोमांस जप्त.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :कोठला परिसरामध्ये शुक्रवार दि. १९ रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी अवैध कत्तलखान्यावर छापा टाकत जवळपास ७०० ते ८०० किलो गोमांस जप्त केले आहे. या प्रकरणी काही जणांना ताब्यात घेण्यात आले असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत कोठला परिसरात अवैध कत्तलखाना सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सहाय्यक पोलिस अधिक्षक डॉ. अक्षय शिंदे, तोफखाना पोलिस ठाण्याचे पो. नि. सुरेश सपकाळे, श्री. सनस, श्री. पाटील त्याचबरोबर त्यांच्यासोबत असलेल्या पथकातील अभिजीत अरकल, गणेश चव्हाण, सचिन जाधव, युवराज गिरवले, श्री. फसले, श्री. तुपेकर, श्री. ओव्हळ, श्री. हारके यांच्या पथकाने कारवाई करत जवळपास ७०० ते ८०० किलो गोमांस जप्त केले. या प्रकरणी काही जणांना ताब्यात घेण्यात आले असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.