भिडे-एकबोटे यांच्या अटकेची मागणी.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :भीमा-कोरेगाव दंगलीचे सूत्रधार हे संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे असून त्यांना तातडीने अटक करा. तसेच त्यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवावा. १ जानेवारी रोजी दंगलीत झालेली हानी त्याची नुकसानभरपाई त्वरित द्यावी व भीमा कोरेगाव दंगलीचा निषेध म्हणून सहभागी झालेल्या जनतेवर नोंद करण्यात आलेले गुन्हे मागे घ्यावे, निरापराध अटक केलेल्या तरुणांची त्वरीत सुटका करावी, या मागणीचे निवेदन भारिप-बहुजन महासंघाच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
ओबीसी संघटना, महाराष्ट्र लोकशाही आघाडी, समतावादी, पुरोगामी, संविधानवादी, मानवतावादी, लोकशाहीवादी, आंबेडकरवादी या सर्व संघटना निदर्शने करताना सहभागी झाल्या होत्या. तसेच भारिप-बहुजन महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष पि.के. गवारे, जिल्हाध्यक्ष संजय गवारे, लोकशाही विचारमंच अध्यक्ष सोमा शिंदे, प्रकाश साळवे, अमोल निकाळजे, निवृत्ती खेतमाली, लता भांड, गौतम वाघमारे, रामा कांबळे, अक्षय शिकारे, शाम गवारे आदी उपस्थित होते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.