श्रीगोंद्याच्या गणेशला वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :श्रीगोंदा तालुक्यातील वडाळी येथील गणेश दिगंबर बायकर या तरुणाने राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत ७७ की. वजनी गटात सुवर्णपदक पटकावले. शेतकऱ्याचा मुलगा असलेला गणेश आता राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
यवतमाळ येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये सोळा ते अठरा जानेवारी दरम्यान या राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग क्रीडा स्पर्धा पार पडल्या. ७७ किलो वजनी गटात गणेश ने तब्बल २३४ किलो वजन उचलत राज्यात प्रथम क्रमांक पटकवला व सुवर्णपदाचा मानकरी ठरला. या कामगिरीमुळे आता तो भुवनेश्वर (ओरिसा) येथे पुढील महिन्यात होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
राज्य व विभाग पातळीवर गणेशने यापूर्वी अनेक पदके प्राप्त केली आहेत. स्वत:च्या वजनाच्या तब्बल तिप्पट वजन उचलण्याचा विक्रम त्याने नोंदवला असल्याने त्यांच्या कामगिरीकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहे. त्याला आंतराष्ट्रीय दर्जाच्या मार्गदर्शिका उज्वल माने यांचे प्रशिक्षण मिळाले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.