अल्पवयीन मुलाने चोरले तब्बल तेरा मोबाईल !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :संगमनेर शहरातील मालदाड रोड येथे राहणारे विठ्ठल किसन सोनवणे यांच्या मुलीचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल दि. २२ ऑक्टोबर २०१७ रोजी घरातून चोरट्याने चोरुन नेला असल्याची फिर्याद शहर पोलिस ठाण्यात नोंदविली होती. त्यानुसार शहर पोलिसांनी तपास केला असता एका अल्पवयीन मुलाने हा मोबाईल चोरुन नेल्याचे उघडकीस आले असून तीन महिन्यांत विविध कंपन्यांचे तेरा मोबाईल या अल्पवयीन मुलाकडे पोलिसांना मिळून आले.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
याबाबत शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, विठ्ठल सोनवणे हे आपल्या कुटुंबासोबत भरतनगर, मालदाड रोड याठिकाणी राहत आहे. दि. २० ऑक्टोबर २०१७ रोजी त्यांची मुलगी भाऊबीजकरीता त्यांच्याकडे आली होती. दि. २२ ऑक्टोबर रोजी सकाळी नेहमीप्रमाणे ते फिरण्यासाठी गेले. त्यानंतर घरी आल्यावर त्यांच्या मुलीचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल घरामध्ये नव्हता. घरातील सर्वांनी मोबाईल शोधला मात्र तो कुठेही मिळून आला नाही. त्यानंतर सोनवणे यांनी शहर पोलिस ठाण्यात मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल केला होता. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
त्यानंतर शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गोकुळ औताडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक पंकज निकम यांनी तपासाची चके्र फिरवताच हा मोबाईल एका अल्पवयीन मुलाकडे मिळून आला. या मुलाकडे अधिक चौकशी केली असता त्याच्याकडे सॅमसंग कंपनीचे सहा, विवो कंपनीचा एक, एम.आय.कंपनीचा दोन, पॅनॉसॉनिक कंपनीचा एक, नोकीया कंपनीचा एक व आणखी एक मोबाईल असे एकूण तेरा मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.