लाल बावट्याचा जिल्हा असलेल्या नगरमध्ये भाजप आला कसा - खा. शरद पवार.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :एकेकाळी लाल बावट्याचा जिल्हा असलेल्या नगरमध्ये भाजप आला कसा ? हा मला पडलेला प्रश्न आहे. सध्या देशात खाणाऱ्यांचा विचार केला जात आहे. पिकविणाऱ्यांचा विचार केला जात नाही. एकीकडे सर्व शेतीमालाचे भाव पडलेले असताना दुसरीकडे बियाणे, खते, औषधांच्या किमती वाढत आहे. परिणामी शेतीचे अर्थकारण संकटात आले आहे. शेती अडचणीत आल्याने लोकांची क्रयशक्ती कमी होऊन देशाचा आर्थिक गाडा दुबळा बनेल, अशी भीती माजी केंद्रीय कृषिमंत्री राष्ट्रवादीचे कॉँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी व्यक्त केली.


----------------------------
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा Ahmednagarlive24 App https://goo.gl/A1KePS 
-------------------------------
येथील रयत संकुलात कॉ. पी. बी. कडू पाटील यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त आयोजित समाजक्रांती पुरस्कार वितरणप्रसंगी खा. पवार बोलत होते. अध्यक्षस्थानी विधानपरिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील होते. मंचावर शेकापचे आ. गणपतराव देशमुख, रयतच्या उपाध्यक्षा जयश्री चौघुले, आ. बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड, रयतच्या कार्यकारिणी सदस्या मीनाताई जगधने, पुष्पाताई काळे, नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे आदी उपस्थित होते.

आज शेतकरी अडचणीत असताना त्याची आर्थिक, सामाजिक ताकद कशी वाढेल यासाठी समाजकारण, राजकारण करणे गरजेचे आहे. परंतु, सध्या देशभर अडचणीचे चित्र आहे. साखरेचे आजचे भाव २९२० रुपयांवर आले. आम्ही सत्तेत असताना एफआरपीनुसार उसाला भाव देण्याची जबाबदारी स्वीकारली. आता साखरेचे भाव दिवसेंदिवस कोसळत असताना उसाला एफआरपीनुसार भाव कसा मिळणार. उसासारख्या नगदी पिकाची ही दैना असेल तर इतर पिकांचे काय? आम्ही सत्तेत असताना कापसाला पाच ते सहा हजार रूपये भाव मिळत होता. सध्या तो ३८०० रूपयांवर आला आहे. या देशात सध्या खाणाऱ्यांचा विचार सुरू झाला आहे. पिकविणाऱ्यांचा विचार केला जात नाही. त्यामुळे भविष्यात आपल्याला १९७२ च्या दुष्काळातील लाल भाकरी पुन्हा खाण्याची वेळ आल्याशिवाय राहाणार नाही.

--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
आ. वळसे म्हणाले, कडू पाटलांनी आयुष्यभर सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी वकिली व राजकारणर केले. त्यांच्या नावाने सांगोल्याला ११ वेळा आमदार राहिलेल्या गणपतरावांसारख्या ऋषीतुल्य व्यक्तीला पुरस्कार दिल्याने महाराष्ट्र घडविण्याच्या कामाला आणखी बळ मिळणार आहे.

कार्यक्रमास राष्ट्रवादीचे नेते अविनाश आदिक, माजीमंत्री अण्णासाहेब म्हस्के, डॉ. अशोक विखे, शिर्डी संस्थानचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, नगराध्यक्षा ममता पिपाडा, आ.डॉ. सुधीर तांबे, दादाभाऊ कळमकर, राजेंद्र पिपाडा, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले, माजी आ. नरेंद्र घुले, आ. शिवाजी कर्डिले, माजी खा. प्रसाद तनपुरे, ॲड. विजय कडू, युवानेते किरण कडू, पंकज कडू, उपसरपंच गणेश कडू, रयत सेवा संघाचे भाऊसाहेब पेटकर, रयत संकुलाचे प्राचार्य बी. एल. आसावा, शोभाताई कडू, कृष्णागर जेजुरकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, विद्यार्थी, ग्रामस्थ व महिला उपस्थित होते.
-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.