वाढत्या शहराच्या गरजा ओळखून विकास कामे सुरू- आदिक.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :श्रीरामपूर शहराचा चारही बाजूंचा झपाट्याने विस्तार होत असल्याने विकास कामे करताना सर्व बाबींचा बारकाईने विचार करून कामे करत असल्याचे प्रतिपादन नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी प्रभाग क्रमांक १६ मधील विविध विकास कामांच्या शुभारंभप्रसंगी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ.भाऊसाहेब कांबळे होते. यावेळी सिद्धार्थ मुरकुटे, नगरसेविका स्नेहल खोरे, नगरसेवक किरण लुणीया, प्रकाश ढोकणे, कलीम कुरेशी, दीपक चव्हाण, राजेंद्र पवार हे उपस्थित होते.
----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
यावेळी बोलताना आदिक म्हणाल्या की, शहरातील विकास कामे करताना प्रत्यक्ष कामाची आपण स्वतः पाहणी करतोच. मात्र नागरिकांनीही स्वतः लक्ष ठेवावे. प्रभागाच्या विकासात नगरसेवकांची भूमिका महत्वाची असून सुदैवाने स्नेहल खोरेंसारख्या कर्तव्यदक्ष सहकारी मिळाल्याने प्रभाग क्र.१६तील अनेक कामे वर्षभरातच मार्गी लागली आहे. आ.कांबळे यांनी आजवर वर्षभरात खोरेंनी मागणी केलेल्या सर्व कामांना आपण निधी दिला असून एखादे काम हाती घेतल्यावर त्याचा पाठपुरावा कसा करावा याचे खोरे दाम्पत्य उत्तम उदाहरण असल्याचे सांगितले. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
तर आपल्या प्रास्ताविकात केतन खोरे यांनी आजवर केलेल्या विकास कामांची माहिती देत आ.कांबळे, नगराध्यक्षा आदिक यांनी केलेल्या सहकार्याबद्दल ऋण व्यक्त केले. आभार जिल्हा नियोजन समिती सदस्या/नगरसेविका स्नेहल खोरे यांनी मानले. यावेळी अशोक बँकेचे संचालक नाना पाटील, योगेश जाधव, विवेक तांबे, शुभम चोथवे, शरीफ शेख, राजू धनगे, वैभव रासने, जनार्दन दौंडे, हेमंत चौधरी, उमेश अनकईकर, संतोष कासलीवाल, कर्डीले सर, शाम तांबे, औताडे, कुलांगे, गवळी सर, साबळे, सातपुते, चिन्मय गोरे, निरंजन भोसले, डावखर, सोहेल शेख, राजेंद्र ढोकचौळे, तागड सर, राहुल बोंबले, लबडे, रासकर सर, सांगळे सर, शेटे सर, शाह, आदित्य आदिक, अविनाश पोहेकर आदी उपस्थित होते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.