अनमॅच' यादीतील शेतकऱ्यांनी त्रुटींच्या पूर्ततेसाठी आवश्यक कागदपत्रे दाखल करण्याचे सहकार विभाग आणि जिल्हा सहकारी बॅंकेचे आवाहन

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना-2017 अंतर्गत जिल्ह्यात आजअखेर 1 लाख 83 हजार 894 पात्र शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर 523 कोटी 3 लाख रुपयांची रक्कम प्राप्त झाली आहे. मात्र, राज्य शासनाच्या महाऑनलाईन पोर्टलमार्फत जिल्ह्यातील एकूण 90 हजार 558 शेतकरी सभासदांच्या खात्यांची माहिती बॅंकेच्या खात्याशी जुळत नसल्याने ती यादी बॅंकांना प्राप्त झाली आहे. अशा प्रकारच्या याद्या सर्व संबंधित बॅंक शाखा स्तरावर प्रसिद्ध करण्यात आल्या असून संबंधित विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या गटसचिवांकडेही उपलब्ध करुन दिल्या आहेत. 


----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील अचूक माहिती घेऊन संबंधित बॅंकेच्या शाखाधिकाऱ्यांशी गटसचिवांमार्फत तात्काळ संपर्क साधावा आणि त्रुटींची पूर्तता करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) अनिलकुमार दाबशेडे आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांनी केले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत बॅंकेशी संलग्न असणाऱ्या प्राथमिक वि.का.स.सेवा संस्थेच्या सभासदांना वेळोवेळी कर्जमाफीच्या रकमा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. मात्र, महाऑनलाईन पोर्टलकडून बॅंकेच्या माहितीशी जुळत नसलेल्या (अनमॅच) यादी प्राप्त झाली आहे. या याद्यांच्या माहितीतील तफावतीमुळे ताळमेळ घालणे शक्य होत नसल्याने संबंधित यादीत नाव असणाऱ्या शेतकरी खातेदारांनी तात्काळ आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करुन गटसचिवांमार्फत बॅंकेकडे जमा करावीत, जेणेकरुन एकही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही, असे आवाहन करण्यात आले आहे.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
या अनमॅच यादीबाबत संबंधित बॅंक शाखाधिकारी हे गटसचिव आणि नियुक्त शाखानिहाय लेखापरीक्षक, सहकारी संस्था यांच्या मदतीने विकास संस्थेच्या आणि बॅंकेच्या अभिलेख्यावरुन माहितीची शहानिशा करणार आहेत. यादीतील त्रुटी दूर करुन अचूक माहिती त्यानंतर पोर्टलवर अपलोड केली जाणार आहे.

बॅंकेने पोर्टलवर सादर केलेली माहिती विचारात घेऊन तालुकास्तरीय समिती याबाबत शेतकरी कर्जमाफीस पात्र आहे किंवा नाही, याबाबत निर्णय घेणार आहे. त्यामुळे या अनमॅच यादीत नाव असणाऱ्या शेतकऱ्यांनी तात्काळ माहिती आवश्यक त्या कागदपत्रांसह गटसचिवांमार्फत बॅंकेकडे प्रत्यक्ष सादर करावी, असे आवाहन श्री. दाबशेडे आणि श्री. वर्पे यांनी केले आहे.

तालुकानिहाय न जुळणाऱ्या अर्जदारांची (अनमॅच) संख्या पुढीलप्रमाणे आहे. अकोले -8538, जामखेड- 4153, कर्जत- 5545, कोपरगाव - 2255, नगर- 8998, नेवासा- 2299, पारनेर - 11441, पाथर्डी -3941, राहाता -4044, राहुरी- 5664, संगमनेर- 8802, शेवगाव- 6584, श्रीगोंदा- 15936 आणि श्रीरामपूर -2358 असे एकूण 90 हजार 558 अनमॅच खातेदारांची संख्या आहे. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.