निष्ठावान कार्यकर्ते हाच पक्षाचा आत्मा : आ.मोनिका राजळे.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक कामात योगदान देणाऱ्या सामान्य कार्यकर्त्याला पक्ष सन्मानित करेल. निष्ठावान कार्यकर्ते हाच पक्षाचा आत्मा असतो. उत्तर प्रदेश व गुजरात निवडणुकीत संघटनात्मक कामे करणाऱ्यांना पक्षाने न्याय दिल्याचे प्रतिपादन आमदार मोनिका राजळे यांनी केले. येथील खरेदी-विक्री संघाच्या अप्पासाहेब राजळे सभागृहात आयोजित बैठकीत राजळे बोलत होत्या. 
----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
अध्यक्षस्थानी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड होते. या वेळी नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, राहुल राजळे, बापूसाहेब भोसले, अभय आव्हाड, सोमनाथ खेडकर, विष्णुपंत अकोलकर, महेश फलके, अरुण मुंडे, पुरुषोत्तम आठरे, रवींद्र वायकर, काकासाहेब शिंदे, सुनील ओव्हळ व भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी व पाथर्डी-शेवगाव तालुक्यातील बूथप्रमुख उपस्थित होते.

या वेळी बोलताना राजळे म्हणाल्या, भाजपाचे शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक दिनकर गर्जे यांनी संघटनेत केलेल्या कामाचा गौरव प्रदेश पातळीवर केल्याचे सांगून असे कार्यकर्ते पक्षात असतील तर निवडणुकीतला विजय भाजपाचाच असेल. वन बूथ, टेन यूथ ही संकल्पना भारतीय जनता पक्षाच्या संघटना कार्यात लक्षवेधी ठरली आहे. 

आता पक्षाने 'वन बूथ, थर्टी यूथ 'ही संकल्पना राबविण्याचे धोरण आखले आहे. बूथप्रमुखांना किती महत्व असते, याची जाणीव उत्तरप्रदेश व गुजरातच्या निवडणुकांमधुन कार्यकर्त्यांना झाली आहे. पक्षसंघटनेत काम करणाऱ्यांना चांगले दिवस येतील. केंद्र व राज्य सरकाने राबविलेल्या जलयुक्त शिवार योजना, कर्जमाफी, बोंडअळीचे अनुदान, यासारख्या योजनांच्या माध्यमातून केलेली विकासाची कामे ही जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम स्थानिक कार्यकर्त्यांनी करावे. काम करणाऱ्यांची पक्ष नक्कीच दखल घेईल. 

या वेळी बोलताना भानुदास बेरड म्हणाले, भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा राजकीय पक्ष आहे. पक्षसंघटनेत काम कराणारा सामान्य कार्यकर्ता पक्षाचा आधारस्तंभ आहे. स्थानिक पातळीवर सरकारच्या विविध योजना गरिबांच्या घरापर्यंत नेऊन पोहचविणारा हा घटक मूळ आहे. पक्षातील पदाधिकाऱ्यांपेक्षाही महत्वाचा घटक बूथप्रमुख व स्थानिक कार्यकर्ता आहे. निवडणुकीत बूथप्रमुखांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. पक्षसंघटना मजबूत करून आगामी काळातील तयारी करावी.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.