चेक न वटल्याप्रकरणी कैदेची शिक्षा.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :कर्जापोटी दिलेला चेक न वटल्याप्रकरणी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पी. व्ही. धाडगे यांनी कर्जदार संदीप बाबुराव सातपुते (रा. अरणगाव, ता. नगर) यांना दोषी धरुन कैदेची शिक्षा सुनावली. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
या खटल्याची सविस्तर माहिती अशी की, मेहेर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेकडून कर्जदार संदीप बाबुराव सातपुते (रा. अरणगाव, ता. जि. अ.नगर) यांनी घर दुरुस्तीसाठी ७५ हजार रुपये कर्ज घेतले होते. सदर कर्जाची परत फेड न केल्याने मेहेर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेने संदीप सातपुते यांचे विरुद्ध चेक न वटल्याबाबत केस केली होती.

सदर खटला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पी. व्ही. धाडगे यांच्यासमोर चालला न्यायालयाने कर्जदार सातपुते याला दोषी धरुन कैदेची शिक्षा सुनावली. नुकसान भरपाई म्हणून मेहेर ग्रामीण पतसंस्थेला १ लाख ६ हजार रुपये एक महिन्यात भरण्याचा आदेश केला. 

सदर रक्कम एक महिन्यात न भरल्यास १ महिना कैदेची शिक्षा सुनावली. या खटल्यात संस्थेच्या वतीने ॲड. सी. एम. शेकडे यांनी काम पाहिले. त्यांना पतसंस्थेचे टुमेश कान्हु अजबे व लक्ष्मण गोविंद पुंड यांनी सहकार्य केले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.