पाथर्डीत महिलेची एसटी बसमध्येच झाली प्रसूती.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :पाथर्डी तालुक्यातील आल्हणवाडी येथील एका महिलेची एसटी बसमध्येच प्रसूती झाली. या महिलेने एका गोंडस मुलीला ज़न्म दिला. याबाबतची माहिती अशी की, पाथर्डी तालुक्यातील आल्हणवाडी येथील एक गोरदरमाता गुरुवारी आपल्या वडिलांसोबत पाथर्डी येथून पाथर्डी- नगर एसटी बसने नगरला वैद्यकीय तपासणीसाठी जात होती. 


----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
ही बस करंजी बसस्थानकाजवळ आली असता, या महिलेच्या पोटात दुखू लागले. या वेळी बसचालक नवनाथ कुटे व वाहक बाळासाहेब वायकर यांनी प्रवाशांना खाली उतरवले. व काही वेळातच या महिलेने एका गोंडस मुलीला जन्म दिला. त्यानंतर या महिलेस ग्रामस्थांच्या मदतीने तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

तेथे डॉ. संदीप अकोलकर, डॉ. त्रिवेणी अकोलकर, आरोग्यसेविका रिना गोताळे यांनी पुढील सर्व उपचार केल्याने बाळ आणि बाळाची आई सुखरूप आसल्याचे सांगितले. बसमध्ये प्रसूती झालेल्या मातेला वेळेवर उपचार अन् मदत मिळाल्याने या महिलेच्या कुटुंबीयांनी बसचे चालक -वाहकासह करंजी येथील हॉटेल व्यावसायिक, ग्रामस्थ, डॉक्टर, आरोग्यसेविका यांना धन्यवाद दिले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.