मारुती कारच्या अपघातात एक ठार, दोन जखमी.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे मारुती कार रस्ता दुभाज़कावर आदळून झालेल्या अपघातात एक महिला ठार झाली तर इतर दोघे ज़खमी झाले. हा अपघात पुणे - नगर महामार्गावर नारायणगव्हाण येथे शासकीय दूध डेअरीसमोर दि.१८ रोजी सकाळी ८.३० वा.च्या सुमारास घडला. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, दि. १८ रोजी मारुती वॅगन आर. एम. एच.१४, जी. एच.-४८२१ ही मारुती वॅगन पुण्याकडून नगरच्या दिशेने भरधाव येत असताना नारायणगव्हाणज़वळ चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने कार रस्ता दुभाज़कावर ज़ाऊन आदळली. 

या अपघातात नर्मदाबाई पंढरीनाथ थोरावे (वय - ४३), रा. आळंदी, जि. पुणे यांचा मृत्यू झाला तर नितीन पंढरीनाथ थोरवे, (वय -२१) व पंढरीनाथ तात्याबा थोरवे ( वय -४७ ), रा. आळंदी हे जखमी झाले. या अपघातात वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. 

याप्रकरणी चालक नितीन पंढरीनाथ थोरवे याच्यावर सुपा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोकॉ.एम.आर. आडकित्ते करीत आहेत. दरम्यान, नारायणगव्हाण येथे महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अपूर्ण असल्यामुळे या ठिकाणी वारंवार अपघाताच्या घटना घडत आहेत. संबंधित विभागाने महामार्ग चौपदरीकरणाचे काम त्वरित मार्गी लावावे, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.