नेवाशातून तरुणीचे अपहरण करत आठ हजार रुपयांची रोकड चोरी.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नेवासा येथून तरुणीचे अपहरणासह घरातील आठ हजार रुपयांची रोकड चोरी केल्याची घटना बुधवारी (दि. १७) दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी सहा ते सातजणांविरूद्ध नेवासा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे यातील एका तरुणाने याआधीही तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून गणपतीपुळे येथे पळवून नेले होते. तसेच तिच्याशी बळजबरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. 


----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
रवींद्र विठ्ठल शेंडे, रुपेश तुकाराम शेंडे, गणेश मनोहर शेंडे, संतोष बाबूराव शेंडे व इतर तीन ते चारजण अशी आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी : नेवासा येथे राहणारी तरुणी चुलती, आई व भाऊ यांच्यासमवेत घरात होती. त्यावेळी गावातील रुपेश, गणेश, संतोष व इतर तीन ते चारजण अनोखळी व्यक्ती मोटारसायकलवर तिच्या घराच्या दिशेने येताना दिसले.

याची चुलती, आई त्यांना विचारणा करत असताना घराच्या पाठीमागून ऊसातून रवींद्र हा बळजबरीने घरात आला. सदर तरुणीची सहमती नसताना तिची ओढाताण करू लागला. त्यावेळी तिला सोडविण्यासाठी तिची चुलती व भाऊ मध्ये पडले असता रवींद्र म्हणाला, मी तिच्याबरोबर लग्न केले आहे. मी तिला घेऊन जाणार आहे. तुमचा व माझा काही एक संबंध नाही, असे म्हणत तिच्या चुलतीच्या गळ्यावर चाकू ठेवला.

 त्याच्यासोबत असलेले रुपेश, गणेश, संतोष व इतर व्यक्ती घरात घुसले. रवींद्रने चाकू मारण्याची धमकी देत चुलतीला जोराचा धक्का दिला, त्या खाली पडल्याने त्यांच्या डाव्या हाताला जखम झाली. तसेच तिचा भावालाही जोराचा धक्का दिल्याने तो जमिनीवर पडला. रवींद्रने घरातील कपाटातून आठ हजार रूपये चोरून नेले. तसेच पुतणीला बळजबरीने ओढून मोटारसायकलवर बसवून पसार झाले. त्याच्या सोबत आलेले इतर व्यक्ती त्यांच्या चार मोटारसायकलवर निघून गेले. 

दरम्यान, सदर तरुणीला रवींद्र याने यापूर्वीही पळवून नेले होते. याप्रकरणी ४ नोव्हेंबर २०१७ रोजी नेवासा पोलिसांत तिच्या वडिलांनी फिर्याद दिली होती. पोलिसांनी शोध घेतला असता दोघांना ८ नोेव्हेंबर २०१७ रोजी गणपतीपुळे (ता. रत्नागिरी) येथून ताब्यात घेतले. 

त्यानंतर सदर तरुणीने पोलीस व न्यायालयात जबाब दिला होता. त्यात रवींद्र याने घरच्यांना जीवे मारण्याची धमकी देत लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले. तसेच समंतीशिवाय संबंध प्रस्थापित केल्याचे सांगितले. यावरून आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात येवून त्याला अटक करण्यात आली होती. याप्रकरणात त्याची जामिनावर सुटका झाल्यानंतर त्याने तिला पुन्हा पळवून नेले. याप्रकरणी तरुणीच्या चुलतीने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपींविरूद्ध गु.र.नं. २१/१८, भादंवि कलम ३९५, ३६३, ३६६, ४५२, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.