मुंबईचा सहारा संघ सहकारमहर्षी चषकाचा मानकरी.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :क्रिकेट असोसिएशन ऑफ संगमनेर व जयहिंद युवा मंच यांच्या वतीने आयोजित 20 व्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात राज्यस्तरीय ट्‌वेंटी 20 लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत मुंबईच्या सहारा संघाने नगरच्या साईदीप संघावर रोमहर्षक लढतीत 20 धावांनी मात कारून महाराष्ट्रातील प्रतिष्ठेचा सहकारमहर्षी चषक जिंकला.


----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
मुंबईच्या सहारा संघाला सहकारमहर्षी चषक, प्रथम क्रमाकांचे बक्षीस एक लाख रुपये रोख, द्वितीय क्रमांक 71 हजाराचे बक्षीस नगरच्या साईदीप संघाने मिळाले. तृतीय क्रमांकाचे 51 हजाराचे बक्षीस नगरच्या हुंडेकरी संघाला, चतुर्थ बक्षीस 31 हजार बक्षीस प्रदीप स्पोर्टस नेरुळ संघाला मिळाले. यावेळी विविध वैयक्‍तीक बक्षीसांनी खेळाडूंना गौरविण्यात आले.

प्रदेश युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलात 1 जानेवारी 2018 पासून सुरू झालेल्या या सामन्यांमध्ये चौकार व षटकारांची आतषबाजी पहायला मिळाली. स्पर्धेस प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला होता. उत्कंठावर्धक ठरलेल्या अंतिम सामन्यात मुंबईच्या सहारा संघाने प्रथम फलंदाजी करतांना 173 धावा केल्या. 

मुंबईकडून पीतम पाटील 41, मानसिंह तिगडेने 27 धावा केल्या. प्रत्त्युतरात नगरच्या साईदीप संघाने धमाकेदार सुरुवात केली. अनिकेत देसाईने 30 धावा फटकाविल्या. सलील आगरकरने 33 धावा काढल्या. परंतु मुंबईच्या मानसिंह निगडेने हॅट्‌ट्रीक नोंदवत नगरचा डाव गुंडाळला. त्याच्या तुफानी खेळीने त्याला सामनावीराचा पुरस्कार देवून गौरविण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सचिव रिजाय बागवान, उद्योजक नरेंद्र फिरोदिया, सत्यजित तांबे, गिरीष मालपाणी, मुंबई कॉंग्रेसचे आनंद डुबे, अजय फटांगरे, के. के. थोरात, उपनगराध्यक्ष नितीन अभंग, किशोर पवार, कैलास सोमाणी, कपील पवार, रमेश गुंजाळ, कुंदन लहामगे, ऍड. सुहास आहेर आदी मान्यवर उपस्थित होते.
रिजाय बागवान म्हणाले की, या स्पर्धेमुळे अनेक खेळाडूंना प्रोत्साहान मिळत आहे. नामांकित खेळाडूंचा खेळ पाहण्याची संधी संगमनेरकरांना लाभली. संगमनेरच्या स्टेडिअममध्ये खेळाडूंसाठी अधिकाधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मदत करेल.

सत्यजित तांबे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन संदीप लोहे व नवनाथ गायकवाड यांनी केले. ऍड. सुहास आहेर यांनी आभार मानले. ऍड. सुहास आहेर, मनीष माळवे, संदीप लोहे, गिरीष गोरे, अंबादास आडेप, रमेश नेहे, नामदेव मुटकुळे, निखील पापडेजा, रावसाहेब पगारे, नवनाथ गायकवाड, असीफ तांबोळी, जयवंत अभंग, सचिन जाधव, सचिन भालेकर, संजय गांधी नगर मित्र मंडळ आदींनी विशेष परिश्रम घेतले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.