पोलिसी अत्याचाराच्या निषेधार्थ प्रजासत्ताक दिनी काळे झेंडे फडकविणार : गायकवाड.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :भीमा - कोरेगाव येथील घटना पुर्वनियोजीत तसेच नियोजनबद्धरित्या करण्यात आली असून त्याला शासन मान्यता होती की काय ? असा सवाल उपस्थित करत या घटनेनंतर पोलिसांनी मुख्यमंर्त्यांच्या आदेशानुसार आंदोलक व तरुणांना सराईत गुन्हेगारांप्रमाणे तुरुंगात डांबले आहे. ही दडपशाही असून लोकशाही मुल्याची गळचेपी आहे. त्यामुळे या अत्याचाराच्या निषेधार्थ प्रजासत्ताकदिनी काळे झेंडे फडकविणार असल्याची माहिती आंबेडकरी चळवळीचे नेते अशोक गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
यावेळी बोलताना श्री. गायकवाड पुढे म्हणाले की, धर्माच्या व जातीच्या नावाखाली भांडणे लावून धर्मांधशक्ती त्यांचा हेतू साध्य करत असून सत्तारुढ भाजपाचा घटना बदलण्याचा डाव जनतेने ओळखला आहे. राज्य घटनेतील मुल्यांना बदलण्याची जाहीर भाषा सत्तेतील लोक करत असून ही चिंतेची तसेच चिंतनाची बाब असल्याचे ते म्हणाले. 
-------------------------
ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, Add करा 9146410937 हा आमचा नंबर
----------------------------
जातीय सलोखा निर्माण करण्याच्यादृष्टीने सर्व समतावादी विचारवंत नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी एकत्र येणे काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगत देश सध्या संक्रमण अवस्थेतून जात असून उजव्या व अतिउजव्या विचारप्रवाहामुळे देशाचे विभाजन होईल की काय अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे ते म्हणाले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.