शिर्डी-सिन्नर' चौपदरीकरणाच्या हालचालींमुळे शेतकरी चिंताक्रांत

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी रस्तेजोड प्रकल्पांतर्गत मोठ्या प्रमाणावर केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून रस्त्याची कामे काही ठिकाणी सुरू आहेत, तर काही ठिकाणी सुरू होण्याचे संकेत आहेत. त्या पार्श्वभूमीवर शिर्डी ते सिन्नर या चौपदरी रस्त्याबाबत अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे. त्या अंतर्गत सावळीविहीर, सावळीविहीर खुर्द, देर्डे कोऱ्हाळे या गावातील रस्त्यालगत असलेल्या क्षेत्राचे गट नंबर व क्षेत्रफळ प्रकाशित झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. 
----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
काही शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च करून राहाण्यासाठी बंगला, पाण्यासाठी विहीर, काहिंनी हॉटेल तर काहींनी जनावरांसाठी गोठा, कांद्याच्या चाळी बांधलेल्या आहेत. या राज्य मार्ग क्रमांक १६०च्या रस्ता निर्माण, रुंदीकरण, चौपदरीकरण, देखभाल व्यवस्था व वापर सार्वजनिक प्रयोजनासाठी ज्या ठिकाणची जमीन व क्षेत्र संपादित केले जाणार आहे, त्याचा उल्लेखसुद्धा अधिसूचनेत करण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांच्या हरकती व त्यांची बाजू ऐकून घेऊन अधिक चौकशीसाठी काही शेतकऱ्यांनी २१ दिवसांच्या कालावधीत शिर्डी प्रांताधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर केलेले आहे.
---------------------------
ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, Add करा 9146410937 हा आमचा नंबर
----------------------------
या ३ गावांच्या दरम्यान जवळपास अनेकांच्या क्षेत्रातून व कसत असलेल्या शेती मधून जागा संपादित होणार असल्यामुळे कमी क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे. या चौपदरीकरणात कोपरगाव तालुक्यातील देर्डे कोऱ्हाळे व राहाता तालुक्यातील सावळीविहीर खुर्द व बुद्रुक या गावातील रस्त्यालगतच्या क्षेत्राचा समावेश आहे. त्यात काही जिरायती, काही हंगामी बागायती व बागायती क्षेत्राचा समावेश आहे. या रस्त्यामुळे नाशिक- सिन्नर व सिन्नर- शिर्डी या प्रवासादरम्यान वेळेची बचत होणार असून त्याचा फायदा लगतच्या काळात जरी होणार असला तरी या परिसरातील शेतकरी चिंता ग्रस्त दिसून येतात.

बंगल्यात राहाण्याचे स्वप्न अधुरेच.
सावळीविहीर रस्त्यालगत शेतकरी व पत्रकार विजय खरात यांची शेती आहे. शेतावर जवळपास २० लाख रु. खर्च करून बंगल्याचे काम पूर्ण केले. लाईट, रंगरंगोटी व दरवाजा बसवण्याचे काम सुरू करण्यासाठी तयारी चालू असताना चौपदरीकरणाची अधिसूचना प्रसिद्ध झाली आणि त्यात त्यांचे क्षेत्र जात असल्याने हे कुटुंब हतबल झाले आहे. बंगल्यात राहाण्याचे स्वप्न अधुरेच राहाते की काय, हे सांगताना ते भावविवश झाले होते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.