मध्यवर्ती कारागृह अधीक्षकांच्या गाडीला अपघात.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :अमरावती येथील मध्यवर्ती कारागृहाचे अधिक्षक रमेश विष्णू कांबळे (वय ५५) यांच्या गाडीला अपघात होऊन ते जखमी झाल्याची घटना बुधवार दि. १७ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील घारगाव येथे घडली. 
----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रमेश कांबळे हे पुणे जिल्ह्यातील दिघी रोड, भोसरी येथील असून सध्या ते अमरावती याठिकाणी मध्यवर्ती कारागृहाचे अधिक्षक आहेत. बुधवारी ते आपल्या स्विफ्ट डिझायर कार क्रमांक एमएच १२ जेसी २२१० हिच्यामधून पुणे येथून संगमनेरच्या दिशेने येत होते.
---------------------------
ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, Add करा 9146410937 हा आमचा नंबर
----------------------------
सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास घारगाव शिवारातील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील भारत ज्युनिअर कॉलेजजवळ आले असता त्याच दरम्यान त्यांच्या कारसमोर अचानक गाय आली. त्यामुळे त्यांनी जोराचा ब्रेक दाबला व कार उलटली. या अपघातात कांबळे जखमी झाले आहेत. आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत त्यांना औषधोपचारासाठी रुग्णवाहिकेद्वारे खासगी हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले होते. अपघातामध्ये स्विफ्ट डिझायर कारचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.