श्रीरामपूरात ॲसिड बल्ब विद्यार्थिनीच्या तोंडावर फेकला.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :श्रीरामपूर  तालुक्‍यातील गोंडेगाव येथे तरुणीच्या तोंडावर दोघांनी ऍसिडसदृश द्रव भरलेला बल्ब फेकला. सोमवारी हा प्रकार घडला. काही महिन्यांपूर्वी गोंडेगाव येथील एका तरुणीची अजय सोपान आमले व जयवंत चंद्रभान फोफसे (दोघे रा. गोंडेगाव, श्रीरामपूर) यांनी छेड काढली. श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झाला होता. 

----------------------------
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा Ahmednagarlive24 App https://goo.gl/A1KePS 
-------------------------------
हा गुन्हा मागे घेण्यासाठी फोफसे व आमले यांनी दोन दिवसांपूर्वी चितळी – पुणतांबा रस्त्याने गोंडेगाव येथे जाणाऱ्या तरुणीला रस्त्यात अडवले. मोटारसायकल थांबवून त्या दोघांनी तरुणीला “पूर्वीची केस मागे घे,’ अशी दमबाजी केली. केस मागे घेणार नाही, काय करायचे असेल कर.. मी घाबरत नाही,’ असा पवित्रा तरुणीने घेताच दोघांपैकी एकाने खिशातून ऍसिडसदृश द्रव भरलेला बल्ब तिच्या तोंडावर फेकला. 
---------------------------
ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, Add करा 9146410937 हा आमचा नंबर
----------------------------
तरुणीने प्रसंगावधान राखून तोंड बाजूला केल्याने पुढील अनर्थ टळला. याबाबत तरुणीने पोलिसांत फिर्याद दिली आहे. आमले व फोफसे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तरुणीचे वडील आणि आईचे जबाब नोंदवले आहेत. पुढील तपास साहाय्यक फौजदार साठे करत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.