निंबळक बायपास रोडवर ट्रकच्या धडकेत युवक ठार.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :निंबळक बायपास रोडवर अज्ञात ट्रकने दुचाकीस्वाराला दिलेल्या धडकेत २२ वर्षीय युवक ठार झाला असून अन्य एक जण जखमी झाल्याची घटना रविवार दि. १४ रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. 

----------------------------
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा Ahmednagarlive24 App https://goo.gl/A1KePS 
-------------------------------
याबाबत सविस्तर माहिती अशी की, गजानन पुंडलिक बदनाळे (रा. तेलीखुंट, नगर) हा २२ वर्षीय युवक निंबळक बायपास रोडवरुन दुचाकीने जात असताना ट्रकने दिलेल्या धडकेत त्याचा मृत्यू झाला.
---------------------------
ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, Add करा 9146410937 हा आमचा नंबर
----------------------------

या अपघातात भागवत धोंडीराम लोंढे (रा. बोरुडेमळा) हे जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. दरम्यान याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.