40 लाख रुपयांच्या अपहार प्रकरणामुळे महापालिकेची प्रतिमा मलीन.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :पथदिव्यांच्या कामातील 40 लाख रुपयांच्या अपहारप्रकरणी महापालिकेच्या चौकशी समितीने सादर केलेला अहवाल सध्या गाजत आहे. या अहवालाच्या तपशिलाबाबत नगरकरांमध्ये मोठी उत्सुकता आहे. या प्रकरणाने पालिका व शहराचे वातावरण ढवळून निघाले आहे. तर, महापालिकेची प्रतिमा यामुळे मलीन झाली आहे.

----------------------------
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा Ahmednagarlive24 App https://goo.gl/A1KePS 
-------------------------------
कथितरीत्या बड्यांचा हस्तक्षेप व अधिकाऱ्यांवर दबाव येणे, अधिकाऱ्यांकडून बचावात्मक भूमिका घेणे, काही आक्रमक नगरसेवक, मतदारांमध्ये घोर फसवणूक व निराशा वाट्याला येत असल्याची भावना, आदी अनेक बाबींचे कंगोरे या प्रकरणाला आहेत. चौकशी अहवाल जाहीर झाला असला तरी त्याच्या तपशिलात काय आहे याची उत्सुकता कायम आहे. दरम्यान, या प्रकरणात कोणाकोणावर गुन्हे दाखल झाले व आणखी किती गुन्हे दाखल होणार याबाबतही चर्चा सुरू आहे.
---------------------------
ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, Add करा 9146410937 हा आमचा नंबर
----------------------------
प्रभारी उपायुक्त संतोष धोंगडे व उपायुक्त वालगुडे यांच्या समितीने या प्रकरणाची चौकशी केली. समितीने 5 जानेवारी रोजी बैठक घेतली. या सात अधिकाऱ्यांची चौकशी झाली. त्यात मुख्य लेखा परीक्षक सी. के. खरात, उपायुक्त व्ही. डी. दराडे, शहर अभियंता व्ही. जी. सोनटक्के, प्रभारी उपअभियंता आर. जे. सातपुते, विद्युत पर्यवेक्षक बी. जी. सावळे, अकाऊंट विभागाचे लिपिक अनिल लोंढे व विद्युत विभागाचे लिपिक भरत काळे यांचा समावेश आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.