साईभक्तांची सुरक्षा 'रामभरोसे'

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :साईभक्तांची फसवणूक टाळण्यासाठी नगरपंचायत व पोलिसांनी मार्गदर्शकाची (पॉलिसी) भूमिका बजावणाऱ्या तरुणांना ओळख देण्यासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव केली; मात्र तीन महिने उलटून ओळखपत्र न मिळाल्याने साईभक्तांची सुरक्षा 'रामभरोसे'च ठरत आहे. 

----------------------------
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा Ahmednagarlive24 App https://goo.gl/A1KePS 
-------------------------------
शिर्डीत रोजगाराच्या शोधात अनेक तरूण येत असतात. मोफत मिळणारे भोजन यामुळे मिळेल ते काम करण्याची तयारी तरूणांची असते. शिर्डीत देशभरासह बाहेरील देशातील भक्तांची संख्या वाढत आहे. साईभक्तांना मार्गदर्शन (पॉलिसी) करण्यासाठी तरुणांचेही प्रमाण वाढत आहे. जवळपासच्या चार तालुक्यातून तसेच मराठवाड्याच्या गंगापूर, वैजापूर या भागातील तरूण पॉलिसी करण्याच्या व्यवसायात उतरले आहेत.

साईभक्तांना मार्गदर्शन करून हे तरूण चरितार्थ चालवितात. मात्र यातीलच काही तरूण साईभक्तांना वेठीस धरून फसवणूक करण्याच्या घटना समोर येत आहेत. साईभक्तांनी फसवणूकीच्या घटनांच्या तक्रारी थेट जिल्हा पोलीस प्रमुख व जिल्हाधिकारी यांच्याकडे केल्या होत्या. याची नगरपंचायत व पोलिसांनी दखल घेत पॉलिसी करणाऱ्या तरुणांची वैयक्तिक माहिती गोळा करण्याचे काम सुरू केले होते. तरुणांचा सर्व्हे करून नाव, गाव, फोटो, रहिवासी दाखला, मतदान ओळखपत्र आदींसह अर्ज भरून घेतले होते.
---------------------------
ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, Add करा 9146410937 हा आमचा नंबर
----------------------------
ही माहिती संकलित करून पॉलिसी करणाऱ्या तरुणांना ओळखपत्र दिले जाणार होते. ज्यांच्याकडे हे ओळखपत्र नसेल त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले होते. माहिती गोळा करून अर्ज जमा करण्यात आले; मात्र तीन महिने उलटूनही या तरुणांना अद्याप ओळख मिळाली नसल्याने साईभक्तांची सुरक्षा रामभरोसेच आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.