शिक्षणमहर्षींची जागा शिक्षणसम्राटांनी घेतली !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :शेवगाव तालुक्याचे चाणक्य, अशी ओळख असणारे थोर स्वातंत्र्यसैनिक कै. नानासाहेब भारदे हे दूरदृष्टी असणारे खरे शिक्षणमहर्षी होते. आज शिक्षणमहर्षींची जागा शिक्षणसम्राटांनी घेत शिक्षणाचा बाजार केलेला असताना नानासाहेबांच्या शिक्षण संस्कारांचे महत्व अधिक गडद होते आहे, असे प्रतिपादन भारतीय कृषक समाजचे प्रदेशाध्यक्ष बापूसाहेब भोसले यांनी केले. 

----------------------------
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा Ahmednagarlive24 App https://goo.gl/A1KePS 
-------------------------------
भारदे साक्षरता प्रसारक मंडळाचे संस्थापक थोर स्वातंत्र्यसैनिक व भूमिगत क्रांतिकारक कै. नानासाहेब भारदे यांच्या २५ व्या पुण्यतिथी समारंभात ते बोलत होते, अध्यक्षस्थानी प्रा. रमेश भारदे होते. भोसले पुढे म्हणाले की, '' स्तोत्र पठण, पाठांतर, संथा आदी भारतीय संस्कार हद्दपार करून इंग्रजी शाळा आपल्या मुलांची भारतीय संस्कृतीशी असणारी नाळ तोडत आहेत व पालकही त्यांच्या मागे आपली व मुलांची फरफट करून घेत आहेत ; परंतु नानासाहेब भारदे मराठी व इंग्रजी माध्यम शाळा मात्र जाणीवपूर्वक संस्कारित पिढी घडवते आहे, हे अत्यंत मोलाचे आहे''. 
---------------------------
ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, Add करा 9146410937 हा आमचा नंबर
----------------------------
या कार्यक्रमात प्राथमिक शाळेतील आंतर शालेय वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. प्रास्ताविक सुरेश विधाते यांनी केले. सूत्रसंचालन नीलेश मोरे यांनी केले. कार्यक्रमास सौ. रागिणी भारदे, हरीश भारदे, जीवन रसाळ, प्रल्हाद कुलकर्णी, रजनिकांत छेडा, गोरक्ष बडे, कचरू लोमटे, विक्रांत लांडे, एजाज काझी, नगरसेवक वजीर पठाण यांच्यासह अनेक मान्यवर, पालक व शिक्षक उपस्थित होते. प्राचार्य नसीम पठाण व प्रा. परवीन काझी यांनी आभार मानले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.