शाळा बंदप्रकरणी शिक्षण मंत्र्यांवर गुन्हे दाखल करायला हवे : आ.डॉ.तांबे.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :शाळा बंद प्रकरणी शिक्षण हक्काचे उल्लंघन केले म्हणून शिक्षण मंत्री व शिक्षण सचिव यांचे विरूद्ध गुन्हेच दाखल करायला हवे, असे मत नाशिक पदवीधर मतदार संघाचे आ.डॉ. सुधीर तांबे यांनी व्यक्त केले.रोटरी क्लब अकोलेच्या वतीने शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या तालुक्यातील २५ शिक्षकांना 'राष्ट्र बांधणीचे शिल्पकार' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराचे वितरण काल आ. डॉ. तांबे व आ. वैभव पिचड यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लबचे अध्यक्ष अमोल वैद्य होते. 

----------------------------
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा Ahmednagarlive24 App https://goo.gl/A1KePS 
-------------------------------
डॉ. तांबे म्हणाले, आज शिक्षण क्षेत्रावर विविध प्रहार होत आहे. बदल्यांची टांगती तलवार शिक्षकांच्या डोक्यावर आहे. कायद्याचे उल्लंघन करुन १३०० शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या शाळेतील मुलांना शिक्षणाचा अधिकार नाकारण्यात आला आहे. 

कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल मंत्री व सचिवांवर गुन्हे दाखल करायला हवे. शासनाकडे जाहिरातींवर खर्च करण्यासाठी चार हजार कोटी रुपये आहे आणि शिक्षणासाठी मात्र निधी नाही. म्हणून शासन शाळा बंद करीत आहेत. ५ ते ६ वर्षांपासून शिक्षक भरती बंद आहे. अशास्थितीत विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण कसे देणार असा सवाल त्यांनी केला. रोटरीने अशा परिस्थितीतही शिक्षकांचा केलेला सन्मान ही बाब गौरवास्पद आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.