ओळखपत्राशिवाय रुम देणाऱ्या हॉटेल मालकावर शिर्डीत गुन्हा

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :शिर्डी पोलीसांनी लॉज व हॉटेलची तपासणी सुरु केली असुन ओळखपत्राशिवाय रुम देणाऱ्या हॉटेल चालक व मालकावर गुन्हा दाखल केला आहे.

----------------------------
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा Ahmednagarlive24 App https://goo.gl/A1KePS 
-------------------------------
याबाबत शिर्डी पोलीसांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की, शिर्डीत आलेल्या व्यक्तींना हॉटेल व लॉज चालक-मालकांनी ओळखपत्राशिवाय रुम भाडोत्री देऊ नये असे आदेश दिले आहेत. या विरोधात शिर्डी पोलीसांनी हॉटेल व लॉजची तपासणी मोहीम हाती घेतली असुन पोलीस उपअधिक्षक सागर पाटील यांच्या आदेशाने प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधिक्षक एस.एम. कदम, पो. कॉ.दुर्गा कांदळकर हॉटेल लॉजेस चेक करण्यासाठी गेले असता विवेकानंद नगर परिसरातील हॉटेल साई ब्लेसींग चेक केले असता हॉटेल मालक अभिषेक देहरकर व चालक कृष्णा आगवण यांच्या हॉटेलमध्ये चार जोडपे आढळुन आले. त्यांच्या ओळखपत्राची खात्री न करता त्यांना रुम भाडयाने दिल्याने पोलीसांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचे चौकशीत लक्षात आले. याबाबत हॉटेल चालक-मालक यांच्या विरोधात शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजि नं. १८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.