साईजन्मस्थळ वाद निर्माण करणाऱ्यांबाबतच्या आंदोलनाची रुपरेषा गुरुवारी ठरणार

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :साईबाबांच्या जन्मस्थळाचा वाद निर्माण करणाऱ्या प्रवृत्तीचा शिर्डी ग्रामस्थांनी निषेध करत याबाबत आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी येत्या १८ जानेवारीला दुपारी ४ वाजता ग्रामदैवत मारुती मंदिर येथे तातडीच्या ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे.

----------------------------
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा Ahmednagarlive24 App https://goo.gl/A1KePS 
-------------------------------
साईबाबांच्या जन्मस्थळाचा वाद निर्माण करणाऱ्या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी शिर्डी ग्रामस्थ एकवटले असून याबाबत बैठक घेण्यात आली. साईबाबांनी आपल्या संपूर्ण जीवनात जातीपातीला थारा न देता सबका मालिक एक महामंत्र देऊन जातीपातीच्या भिंती दूर केल्या आहे. साईबाबांची महती सातासमुद्रा पलिकडे पोहोचली असून सर्वधर्मियांच्या एकत्मकेचे प्रतिक म्हणून साईनगरीची ओळख आहे. साईबाबांच्या मान्यतेने लिहिलेल्या साईचरित्रात त्यांच्या जन्मस्थळाचा उल्लेख नाही.

ऐन साईसमाधी शताब्दी महोत्सवाच्या पार्श्वभुमीवर साईबाबांचे तथाकथित जन्मस्थळाचा वाद निर्माण करणाऱ्याचा प्रयत्न केला जात आहे. हा वाद निर्माण करणाऱ्या वृत्तीचा शिर्डी ग्रामस्थांनी निषेध केला आहे. याबाबत चर्चा करण्यासाठी शिर्डी ग्रामस्थांनी येत्या १८ जानेवारी रोजी ग्रामसेभेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे. या सभेस मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.