जामखेडमध्ये साडेतीन लाखांचा गुटखा पकडला.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :जामखेड तालुक्यातील खर्डा-जातेगाव रोडवरील मोहरी परीसरात स्कॉर्पिओ गाडीतुन साडेतीन लाख रुपयांचा गुटखा घेऊन जात असताना जामखेड पोलिसांनी गुटखा पकडल्याची कारवाई केली आहे. याप्रकरणी आरोपी वाहनचालक शंकर तुकाराम शिंदे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक नितीन पगार यांच्या धडक कारवाईमुळे अवैध धंद्यावाल्यांचे धाबे दणाणले आहेत.


----------------------------
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा Ahmednagarlive24 App https://goo.gl/A1KePS 
-------------------------------
याबाबत सविस्तर माहिती अशी की, तालुक्यातील खर्डा - जातेगाव रोडवरील मोहरी परीसरात शंकर शिंदे (रा.बीड) हा स्कॉर्पिओ गाडी (क्र. एम.एच ४६ एन ८००२) या गाडीने बीडकडे चालला होता. याच दरम्यान जामखेड पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक नितीन पगार यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड पोलिस पथकातील पोहेकॉ.राजाराम शेंडगे, अजिनाथ जाधव, शामसूंदर जाधव, सचिन राठोड, मनोज साखरे हे खर्डा रोडवरील जातेगाव परीसरात पेट्रोलिंग करत होते. 

याच दरम्यान या ठिकाणी सदर स्कार्पिओ गाडीस पाठलाग करून थांबवण्यात आले व गाडीची तपासणी करण्यात आली. यावेळी गाडीमध्ये अवैधरीत्या अडीच लाख रुपयांच्या बाबाजी पान मसालाच्या १४०० पुड्या व ९१ हजार रु. ची रॉयल तंबाखूच्या १४०० पुड्या असा एकूण ३ लाख ४३ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी शिंदे व स्कार्पिओ गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. 

पोलीस निरीक्षक नितीन पगार, अन्न व सुरक्षा अधिकारी भारत भोसले व प्रसाद कसबेकर यांनी पंचनामा करून संबधीत माल ताब्यात घेतला आहे. दरम्यान, जामखेड तालुक्यात मावा व गुटख्याची खुलेआम विक्री केली जात असून अन्न व औषध प्रशासनाचे याकडे अर्थपूर्ण तसेच जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. जामखेड पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैधरीत्या मावा व गुटखा विक्री करणाऱ्यांवर वचक निर्माण होणार आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.