ब्लॉग - दक्षिणेची जागा नेमकी कोणाची?

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :लोकसभा निवडणुकीचा बिगूल वाजायला अजून अनेक महिन्यांचा कालावधी असला तरी इच्छुकांकडून मात्र आतापासून मोर्चेबांधणीला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूक दक्षिण मतदारसंघातील चुरशीची होणार याचे संकेत आतापासूनच मिळू लागलेले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी व भाजप-शिवेसेना यांनी मागील लोकसभा निवडणुकीत एकत्र येऊन लढविली होती. 
----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------

मात्र विधानसभा निवडणुकीत आघाडी व युतीत बिघाडी झाल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप यांनी सवतासुभा उभा केला होता. यामध्ये काँग्रेस व राष्ट्रवादीच्या जागा कमी निवडून आल्या. परिणामी काँग्रेस व राष्ट्रवादीची राज्यातील सत्ता गेली. त्यामुळे आता या दोन्ही पक्षांनी आगामी निवडणुका एकत्र लढविण्याचा निर्धार केलेला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या जागेवर काँग्रेसचे व राष्ट्रवादीच्या जागेवर राष्ट्रवादीचे उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहेत.

मागील लोकसभा निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन निवडणूक लढविली होती. अहमदनगर जिल्ह्यातील उत्तर जिल्हा हा काँग्रेसच्या वाट्याला तर दक्षिण जिल्हा हा राष्ट्रवादीच्या वाट्याला गेलेला आहे. मागील निवडणुकीत उत्तरेतून भाऊसाहेब वाकचौर तर दक्षिणेतून स्व. राजीव राजळे यांनी निवडणूक लढविली होती. यामध्ये दोन्ही उमेदवारांना पराभवाची झळ सोसावी लागलेली आहे. 
-------------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी 
फेसबुक पेजला लाईक  https://www.facebook.com/ahmednagarlive24 करा.
----------------------------
यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाली तर उत्तरेची जागा राष्ट्रवादीला व दक्षिणेची जागा काँग्रेसला हवी आहे. तसे ऐनवेळी काय होईल, हे सांगता येत नाही. परंतु सध्या तरी दक्षिणेतून काँग्रेसचाच उमेदवार निवडणूक लढविणार असे बोलले जात आहे. त्यात तथ्थ किती हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे. त्यामुळेच कि काय डॉ. सुजय विखे यांनी आता दक्षिणेत विशेष लक्ष द्यायला सुरुवात केलेली आहे. त्यांच्या या विशेष लक्षामुळे राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ उडाली आहे. 

डॉ. सुजय विखे निवडणूक दूर असली तरी दक्षिणेत मोर्चेबांधणी करत आहे. त्यांची आता दक्षिणेतील वारी सुरु झालेली आहे. या वारीमुळे डॉ. सुजय विखे भाजपात जाणार, काँग्रेसकडून निवडणूक लढविणार, अपक्ष निवडणूक लढविणार अशा वावड्या आता उठू लागलेल्या आहेत. डॉ. विखेकडून स्पष्ट असा कोणताच निर्णय जाहीर करण्यात आलेला नसला तरी चर्चांना मात्र उधाण आलेले आहे. विखे यांची मोर्चे बांधणी सगळ्यांची डोकेदुखी ठरणार असून विखेंनी अजून आपली भूमिका स्पष्ट केलेली नसली तरी त्यांची पडलेली पाऊले सगळ्यांना विचार करायला लावणारी आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते यांनी श्रीगोंद्यातील एका कार्यक्रमात आपल्याकडे दक्षिणेची जागा राहणार असल्याचे जाहीर वक्तव्य केलेले आहे. 

त्यावरून काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये जागेवरून संघर्ष होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीकडून अजूनही उमेदवार कोण उभा राहणार हे स्पष्ट झालेले नसून राष्ट्रवादीच्या कोणत्याच नेत्याने तशा हालचाली केलेल्या नाहीत. परंतु राष्ट्रवादीकडून आमदार राहुल जगताप किंवा नेवाशाचे प्रशांत गडाख यांची नावे पुढे येण्याची शक्यता आहे. ही नावे पुढे आल्यानंतर विखे भाजपाच्या गोटात जाऊन उमेदवारी करू शकतात. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी   
ट्वीटर वर फॉलो https://twitter.com/ahmednagarlive करा.
---------------------------
मागील लोकसभा निवडणुकीच्या वेळीच यशवंतराव गडाख यांचे नाव पुढे आले होते. माजी आमदार चंद्रशेखर घुले व माजी आमदार शंकरराव गडाख यांच्यातील वादामुळे राष्ट्रवादीतून बाहेर पडलेले आहेत. गडाख यांचे नेवाशातील हक्काचे मतदान दक्षिणे लोकसभा मतदार संघात नसल्याने उमेदवारी करण्याची शक्यता कमी आहे. आमदार राहुल जगताप यांचे हक्काचे मतदान लोकसभा मतदार संघात येत असल्याने राष्ट्रवादीकडून राहुल जगताप उमेदवारी करण्याची शक्यता आहे. 

राष्ट्रवादीच्या गोटातून बाहेर पडून भाजपात गेलेले माजीमंत्री बबनराव पाचपुते यांना आमदारकीच्या निवडणुकीत पराभवाची धूळ चाखावी लागलेली आहे. तसेच कृषी महाविद्यालयाच्या मुद्द्यावरून त्यांची जास्त पत भाजपात नसल्याची खंत पाचपुते समर्थकांमधून व्यक्त केलेली जात आहे. त्यामुळे पाचपुते पुन्हा स्वगृती परतू शकतात. पाचपुते यांची ताकद आ. जगताप यांच्या पाठीमागे उभी राहून त्यांना लोकसभेत विजयी करण्यास मदत होणारी आहे. आ. जगतापांना लोकसभेत पाठवून पाचपुते राष्ट्रवादीकडून आमदारकीचा मार्ग पुन्हा मोकळा करून घेऊ शकतात. या शक्यता राजकीय धुरी व्यक्त करीत आहेत. 

गडाख व जगताप यांची नावे पुढे आली डॉ. विखे भाजपाच्या गोटात जाऊन उमेदवारी करू शकतात. सध्या राजकीय विश्‍लेषकांमध्ये तर्कवितर्कच लढविले जात आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावेच चर्चेत असताना भाजपाकडून नेमके कोण याचे मौन पाळण्यात आलेले आहे. नेमके काय होणार हे लोकसभा निवडणुकीच्या अगोदर स्पष्ट होणार आहे. सध्या तरी विखे यांनी संपर्क सुरु केलेला आहे. आगामी निवडणुकीत कोण-कोणाच्या विरोधात उभे राहणार या चर्चेचे फड रंगत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.