शेतकऱ्यांचे जायकवाडीच्या पाण्यात बसून आंदोलन.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :मालकी हक्‍काच्या शेतजमिनीत जाण्यासाठी रस्ता खुला व्हावा, या मागणीसाठी बुधवारपासून (दि. 10) ढोरसडे (ता. शेवगाव) येथील धरणग्रस्त शेतकरी शेतात उपोषणास बसले होते. आज या शेतकऱ्यांनी जायकवाडीच्या शेतामध्ये आलेल्या पाण्यात बसून मंगळवारपासून उपोषण करण्यास सुरुवात केली असून रात्री उशिरापर्यंत ते पाण्यामध्येच होते.

अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी 
फेसबुक पेजला लाईक  https://www.facebook.com/ahmednagarlive24 करा.

येथील धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतजमीन गट नं. 55/2, 56/2, 54 पैकी 49 आदी ठिकाणी शेतजमिनी आहेत. या ठिकाणी शेतात जाण्यासाठी रस्ता खुला करून मिळावा, अशी या शेतकऱ्यांची अनेक वर्षांची मागणी आहे. वेळोवेळी निवेदने, मोर्चे, उपोषण अशी आंदोलने करून पाठपुरावाही शेतकऱ्यांनी केलेला आहे. मात्र, कोणत्याच कार्यवाहीअभावी रस्त्याच्या प्रश्नाचे भिजत घोंगडे कायम आहे.

रस्ता देता येत नसेल तर आमच्या शेतजमिनी संपादित करून घ्याव्यात, असेही शेतक-यांचे म्हणणे आहे. गहू, हरभरा या पिकांचा हंगाम जवळपास संपला असून, ऊस लागवडीसही विलंब झालेला आहे. याअगोदरील पिकांचेही नुकसान झालेले असून त्याचीही नुकसान भरपाई मिळावी, तसेच शेतीवरील कर्ज फेडायचे कसे, हा प्रश्‍न पडला असून प्रशासनाकडून योग्य निर्णयाची अपेक्षा अनिकेत गोसावी यांनी व्यक्त केल्या होत्या.
---------------------------
ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, Add करा 9146410937 हा आमचा नंबर
----------------------------
शनिवारी (दि. 13) शेवगाव येथील तहसील कार्यालयामध्ये दोन्ही बाजूच्या शेतक-यांची तहसीलदार दीपक पाटील यांनी चर्चा घडवून आणली होती. मात्र, या चर्चेत काहीच निष्पन्न झाले नसल्याने आजपासून पाण्यात बसून आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.