बाह्यवळण रस्त्याचे दुरुस्ती काम सुरु निंबळक गटातील ग्रामस्थांच्या दोन वर्षाच्या संघर्षाला यश.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :शहराबाहेरुन जाणार्‍या बाह्यवळण (राज्य महामार्ग रस्ता क्र.222) रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निंबळक गटातील ग्रामस्थांनी केलेल्या आंदोलनाला अखेर यश आले असून, या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. रस्ता दुरुस्तीचे कामाचे उद्घाटन ज्येष्ठ ग्रामपंचायत सदस्य मारुती गारुडकर यांच्या हस्ते झाले. यावेळी निंबळकचे माजी सरपंच विलास लामखडे, अजय लामखडे, ग्रा.पं. सदस्य विलास होळकर, बाबा पगारे, अशोक शिंदे, जगन्नाथ शिंदे, तौफिक पटेल, जयराम जाधव, तस्लीम सय्यद, रामदास होळकर, कुंडलीक जाधव, सुमीत लांबा आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
निंबळकचे माजी सरपंच विलास लामखडे यांच्या नेतृत्वाखाली निंबळक गटातील ग्रामस्थांनी बाह्यवळण रस्त्याच्या दुरुस्तीसाठी अनेक वेळा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना निवेदन देवून, ठिय्या आंदोलन केले होते. दोन वेळा बाह्यवळण रस्त्यावर चक्का जाम आंदोलन करुन, या प्रश्‍नावर अधिकार्‍यांना धारेवर धरण्यात आले होते. आश्‍वासन देवून देखील रस्त्याचे काम होत नसल्याने ग्रामस्थांनी रस्ता खोदून रस्त्याची वाहतुक काही वेळेसाठी बंद केली होती. तसेच जि.प. सदस्य माधवराव लामखडे यांनी देखील या विषयात लक्ष घालून वारंवार केलेल्या पाठपुराव्याने यश मिळाले आहे. ग्रामस्थांच्या आंदोलनाने यंत्रणा कार्यान्वीत होवून यश मिळाल्याची भावना विलास लामखडे यांनी व्यक्त केली. तसेच रस्त्याचे काम चांगल्या दर्जाचे होण्यासाठी ग्रामस्थांचे या कामाकडे लक्ष लागले आहे.

बाह्यवळण रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा प्राप्त झाल्याने दुरुस्तीचे काम रखडले होते. दीड ते दोन वर्षापासून निंबळक गटातील ग्रामस्थांचा या रस्त्यासाठी संघर्ष चालू होता. रस्त्याची मोठी दुरावस्था झाल्याने अनेक लहान मोठे अपघात तर रात्री वाहन चालकांना लुटण्याचे प्रकार घडत आहे. निंबळक गटातील ग्रामस्थांची या रस्त्यावरुन नियमीत रहदारी असल्याने जीव मुठीत धरुन त्यांना प्रवास करावा लागत असल्याने ग्रामस्थांनी या रस्ता दुरुस्तीच्या मागणीला जोर दिला होता. तसेच संपुर्ण रस्ता धुळीने माखल्याने रस्त्यालगत असलेल्या शेतीच्या पीकांचे नुकसान देखील मोठ्या प्रमाणात झाले आहे. लवकरच रस्ता दुरुस्तीचे काम पुर्ण होणार असल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.