विधान परिषदेचे माजी सभापती ना.स.फरांदे यांचे निधन.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :विधान परिषदेचे माजी सभापती आणि नाशिक पधवीधर मतदारसंघाचे माजी आमदार ना. स. फरांदे यांचे पुण्यात निधन झाले आहे. काही दिवसापूर्वी घरात बाथरूममध्ये घसरून पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर पुण्यातील खासगी रूग्णालयात उपचार सुरु होते. अखेर आज त्यांचा पुण्यात उपचारादरम्यान मृत्यू झाला. वयाच्या 78 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन मुली असा परिवार आहे. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
ना.स. फरांदे यांचा राजकीय प्रवास 
कोपरगावला प्राध्यापक असताना सर राजकारणात आले. नगर जिल्हा भाजपाचे ते अध्यक्ष होते. नंतर त्यांनी भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदाचीही सूत्रं सांभाळली. नाशिक पदवीधर मतदारसंघातून ते दोन वेळा विधानपरिषदेवर निवडून गेले. विधान परिषदेचे उपसभापती व सभापती ही दोन्ही पदे त्यांनी भूषविली. त्यांनी नगरमधून लोकसभा निवडणूकही लढवली होती. पण त्यात अपयश आले होते.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
कोपरगावचे शहराध्यक्ष, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष, विधान परिषदेचे सभापती हे सर्व राजकीय पदे त्यांनी अत्यंत प्रभाविपणे भुषविली होती.प्रभावी वक्ते, साहित्यीक, प्रतिभा संपन्न, विद्वान आदि सर्व गुण संपन्न असलेले फरांदे सर आज आपल्यातुन निघुन गेले.प्रा.ना.स.फरांदे सरांच्या निधनाने महाराष्ट्राची मोठी हानी झाली आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.