आमच्यासारख्या पुढाऱ्यांच्या मागे पळू नका -ना. महादेव जानकर.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :राज्यातील फडणवीस सरकार शेतकरी हिताचे निर्णय घेणारे सरकार आहे, असा दावा दुग्ध व पशुसंवर्धन विकासमंत्री महादेव जानकर यांनी केला.जोपर्यंत राज्य मंत्रिमंडळात आहे तोपर्यंत कळसच्या या कृषी प्रदर्शनाला भेट देणारच. मोकळ्या हाताने या प्रदर्शनाला कधी येणार नाही, तर खात्याच्या माध्यमातून मदतच करील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.तालुक्‍यातील कळस येथील कृषी प्रदर्शनाचा समारोप रविवारी झाला. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
जानकर म्हणाले, शेतकऱ्याचा पोरगा उद्योगपती झाला पाहिजे. शिक्षण घ्यायला वारसा लागत नाही. आज पैसा असणारा श्रीमंत नसून बुद्धीवाला श्रीमंत आहे. आमच्यासारख्या पुढाऱ्यांच्या मागे पळू नका, असा सल्ला जानकरांनी दिला. तुम्हाला अडचण आल्यावर रात्री-अपरात्री मला कधीही फोन करा; मी तुमची अडचण सोडवील, असेही ठाम आश्‍वासन त्यांनी दिले.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
अध्यक्षीय भाषणात विकास देशमुख म्हणाले, तीन वर्षांपूर्वी लावलेल्या या छोट्याशा प्रदर्शनाचा वेल आज गगनापर्यंत पोहोचला आहे. शेती व्यवसाय धोक्‍यात आला असून शेतीला पूरक जोडधंद्याची गरज आहे. शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने या कृषी प्रदर्शनात ऍग्रिकल्चर कंपन्या सहभागी झाल्या आहेत. शेतकऱ्यांच्या गरजा पाहून नवनवीन तंत्रज्ञान या प्रदर्शनात छत्रपती प्रतिष्ठानचे तरुण आणत आहेत. ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.