प्रवाशास लुटणाऱ्या सहा महिला ताब्यात.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :शहरातील माळीवाडा बसस्थानकावर प्रवाशास मारहाण करून लुटणाऱ्या सहा महिलांच्या टोळीस कोतवाली पोलिसांनी जेरबंद करण्याची कारवाई केली आहे. उस्मानाबाद येथील युवकास मारहाण करून त्याच्याकडील १ हजार रुपयांची रोख रक्कम या महिलांनी काढून घेतली होती. याप्रकरणी युवकाच्या फिर्यादीवरुन कोतवाली पोलिस ठाण्यात दरोडयाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
दरम्यान या सहाही महिलांना अटक करण्यात आली असून, त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की, माळीवाडा बसस्थानकावर शनिवारी रात्री ११.३० वा.च्या सुमारास उस्मानाबाद येथील तुषार पांडुरंग आडोळ हा तरुण उतरला. बस न मिळाल्यामुळे रात्रीच्या सुमारास तो तरुण बसस्थानकाबाहेर आला. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
यावेळी सुमन विश्वनाथ त्रिभुवन (रा.दातरंगे मळा), जिजाबाई पोपट पवार (रा.रेल्वे स्थानक परिसर), आशा हिरालाल जाधव (रा.रेणुकानगर), कविता अनिल पवार (रा.राधाकृष्णनगर), मिरा मारुती कांबळे, बेबी सुरेश भापकर (रा.भिमवाडी) या महिलांनी त्याला अडवून बाजूला नेत त्याच्या खिशातील १ हजार रुपये बळजबरीने काढून घेतले तसेच त्याला मारहाणही केली.

आडोळ याने याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल केला. पोनि.अभय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व महिलांना अटक करण्यात आली असून, त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोसई. नागवे हे करीत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.