सर्वसामान्यांची ताकद पाठीशी असल्याने विरोधकांना घाबरत नाही - आ.कर्डिले.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  सामान्य दूध उत्पादक ते आमदारापर्यंत आपल्याला सर्वसामान्यांचे पाठबळ लाभले. त्यामुळे कोणीही काम घेऊन आल्यावर जात, धर्म व पक्ष न पाहता केवळ विकासाचे काम केले. सर्वसामान्यांची ताकद आपल्या पाठीशी असल्याने आपण कोणालाही घाबरत नसून कोणाशीही वैयक्तीक हेवेदावे न मानता सरळ मनाने कार्य करीत असल्याचे आ. कर्डिले यांनी सांगितले.
----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
बारागाव नांदूर ते राहुरी रस्त्याला मंजूरी प्राप्त करून देत तब्बल ४.१९ कोटीचा निधी देणारे आ. कर्डिले यांचे आभार व्यक्त करण्यासाठी शिष्टमंडळ गेले असता ते बोलत होते. यावेळी आ. कर्डिले यांनी १५ ते २० वर्षांपासून बारागाव नांदूरसह इतर ७ ते ८ गावांसाठी पुनर्वसन निधी आणण्यासाठी कोणीच प्रयत्न केले नाही. परंतु, त्यासाठी आपण हातात कागदपत्र घेत नगर, नाशिक, पुणे व मुंबई येथे जाऊन वेळोवेळी पाठपुरवा केला. परिणामी पुनर्वसित गावांना झळाळी प्राप्त होण्यासाठी कोट्यवधीचा निधी प्राप्त होत आहे.

--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
तसेच मंत्रिपदासाठी आपण कधीही राज्यातील नेत्यांकडे आग्रह करीत नाही. मंत्रिपदापेक्षा मोठा बहुमान जिल्ह्यात मिळत असून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविले जात आहे. जिल्हा बँक व जिल्हा परिषदेमार्फत अनेक राजकीय नेत्यांचे प्रश्­न आपण मार्गी लावत असल्याचे आ. कर्डिले यांनी सांगितले.

याप्रसंगी सरपंच प्रभाकर गाडे, रस्ता कृती समितीचे अध्यक्ष सत्यवान पवार, काशिनाथ वराळे, संदिप उंडे, श्रीराम गाडे, शिवाजी सयाजी गाडे, रावसाहेब भिंगारदे, पंढू तात्या पवार, भाऊसाहेब गाडे, विलास गाडे आदींनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी समीर पठाण, जिल्लू पिरजादे, किशोर धिमते, सुनील पवार, अमजद पिरजादे, विश्­वास पवार, बबन ईनामदार, इम्रान देशमुख, भाऊसाहेब गाडे, नवनाथ कोहकडे, अहमद देशमुख, सुलेमान पटेल, सुभाष गोपाळे, यासिन इनामदार, तोहिद पिरजादे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.