समृद्धीमुळे कोपरगावातील शेतकरी 'करोडपती'

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :समृद्धी महामार्गाच्या जमीन खरेदीसाठी चांगला भाव मिळत असल्याने ४० टक्के खरेदीचा टप्पा ओलांडला आहे. तालुक्यातील १० बाधित गावातील भोजडे, संवत्सर, धोत्रे, डाऊच खुर्द, जेऊर कुंभारी या पाच गावातील १४१.३०० हेक्टर (३५३.२५ एकर) जमीन खरेदी करण्यात आली आहे. त्या जमिनीपोटी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने आतापर्यंत २५० लाभार्थ्यांना १२० कोटींपेक्षा अधिक रुपयांचे वाटप करून अनेकांना करोडपती केले आहे.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
स्वखुशीने जमीन देणाऱ्यास एकूण रकमेच्या एकपट जादा रक्कम विशेष प्रोत्साहनपर देण्यात आली आहे. तसेच जमीन खरेदी-विक्री करण्यासाठी लागणारे मुद्रांक शुल्क माफ करण्यात आले आहे. सदर रक्कम आरटीजीएस सेवेद्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात एकरकमी जमा होत असल्याने सर्व पांढरा पैसा (व्हाईट मनी) शिवाय मध्यस्थ त्यांचे कमिशन, फसवणूक या सर्व प्रकाराला आळा बसला आहे.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------

बहुचर्चित समृद्धी महामार्गाचा आराखडा.
सुमारे ७१० किमी लांबीचा महामार्ग, खर्च अंदाजे ४६ हजार कोटी. या महामार्गामुळे मुंबई ते नागपूर हे अंतर १६ तासांऐवजी आठ तासांत होणार पूर्ण. १० जिल्हे, ३० तालुके आणि ३५४ गावांतून जाणार, सुमारे २० हजार ८२० हेक्टर जमीन संपादीत करण्यात येणार आहे. नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलढाणा, औरंगाबाद, जालना, अहमदनगर, नाशिक आणि ठाणे या जिल्ह्यातून जाणार, याचे १६ पॅकेजस्मध्ये काम होणार, २०२० पर्यंत काम पूर्ण करण्याचा मानस, तसेच औरंगाबादहून दोन्ही ठिकाणी जाण्यास केवळ चार तास लागणार. हा महामार्ग आंतरराष्ट्रीय मानांकानुसार उभारण्यात येईल हे विशेष!.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.