कुख्यात गुंड अजहर शेखसह ६ जणांना पोलिस कोठडी

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  कुख्यात गुंड अजहर शेखसह सहा जणांच्या टोळीला शनिवारी (दि.१३) रात्री स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने मोठ्या शिताफीने जेरबंद केले. अटक केलेल्या सहा जणांना सोमवारी (दि.१५) न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना गुरुवारपर्यंत (दि.१८) पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केलेल्यांमध्ये आरोपी अजहर शेख (रा.बेलदार गल्ली, सर्जेपुरा), सोमनाथ उत्तम दळवी (रा.भिस्तबाग, अ.नगर), गुड्डू उर्फ शहानवाज हमीद सय्यद (रा.मुकुंदनगर), सचिन कोंडीराम जाधव (रा.केडगाव), हरिओम धर्मेंद्र सहदेव (रा.गंजबाजार, अ.नगर), सिद्धेश संदीप खरमाळे (रा.भांडगाव, ता.पारनेर) यांचा समावेश आहे तर यावेळी अंधाराचा फायदा घेऊन किशोर आरणे (रा.सोनेवाडी रोड, केडगाव) हा फरार झाला आहे. आरोपीकडून पोलिसांनी पाच गावठी कट्टे, ३० जिवंत काडतुसे, २ स्वतंत्र मॅग्झिन, एक चारचाकी, ९ मोबाईल असा ३ लाख ७७ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
यावेळी पोलिसांनी भिस्तबाग महालाजवळ पेट्रोल पंप लुटीच्या तयारी असताना जेरबंद केले. मुकूंदनगरचे नगरसेवक समद वहाब खान यांच्यासह पाच जणांच्या हत्येचा कट रचल्याची धक्कादायक माहिती पोलिस तपासात पुढे आली आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.