वीज उपकेंद्रात स्फोट झाल्याने शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :एमआयडीसी येथील १३२ केव्ही वीज उपकेंद्रात स्फोट झाल्याने महापालिकेच्या पाणी पुरवठ्याचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे मुळानगर येथून होणारा महापालिकेचा पाणी उपसा थांबला आहे. परिणामी शहर आणि उपनगरातील पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. एमआयडीसी येथील वीज उपकेंद्रात रविवारी सायंकाळी बिघाड होऊन स्फोट झाला. वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी याची दुरूस्ती युद्धपातळीवर सुरू केली आहे.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
शहराला पाणीपुरवठा मुळा धरणातून होतो. त्यासाठी एमआयडीसीतून उच्च दाबानं वीजपुरवठा होतो. एमआयडीसीच्या वीज उपकेंद्रात रविवारी सायंकाळी बिघाड होऊन स्फोट झाला. यामुळे पाणी उपशासाठी लागणारी उच्च दाबाचा वीजपुरवठा खंडित झाला. परिणामी, मुळामधून होणारा पाणी उपसा पूर्णपणे थांबला आहे. वीज केंद्रातील बिघाड दुरुस्तीसाठी अधिकारी व कर्मचारी कार्यरत झालेले आहेत.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
त्यात यश देखील आले. परंतु, पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी सुमारे १८ तास लागतात. त्यानुसार नगर शहराचा आणि उपनगराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. या बिघाडामुळे नगर शहरातील काही भागात पाणीपुरवठा होऊ शकलेला नाही. मंगळवारपासून पुन्हा पाणीपुरवठा रोटेशननुसार सुरू होईल, असे पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.