कोपरगावच्या रस्त्यांसाठी २३ कोटीचा निधी - आ.कोल्हे.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :गेल्या साडेतीन वर्षात मतदारसंघातील रस्त्यांसाठी राज्य सरकारकडून ११ कोटी तर केंद्रातून १२ कोटी ८९ लाख रुपयांचा निधी आणला. त्याचप्रमाणे विकासकामे मार्गी लागली आहेत; मात्र श्रेयासाठी धडपडणाऱ्या विरोधकांची गत दुसऱ्याची कढी अन् धावू धावू वाढी, अशी झाली असल्याची टिका आमदार स्नेहलता कोल्हे यांनी केली. 


----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
शनिवारी संजीवनी येथे ब्राम्हणगाव, जवळके, वारी, कान्हेगाव, कुंभारी, बोलकी, वाकडी व धनगरवाडी या आठ ग्रामपंचायतीत भाजपाचे चार ग्रामपंचायतीचे सरपंच व ४४ सदस्यांचा सत्कार व तिळगुळ वाटप प्रसंगी आमदार कोल्हे बोलत होत्या. अध्यक्षस्थानी संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे होते.

आ. कोल्हे म्हणाल्या, राजकारणात संकुचित विचार नको. जाती जातीतील संघर्ष सर्वसामान्यांना परवडणारा नाही. ग्रामपंचायतीचा कारभार चालविताना जनता आणि नेता यांच्यातील महत्वाचा दुवा कार्यकर्ता आहे. त्यांच्या माध्यमातुन तळागाळापयंर्त पोहोेचता येतं. त्यातून जिल्हा परिषद, पंचायत समिती व शासनाच्या योजनांची माहिती सर्वसामान्यांना देता येते, असे त्यांनी सांगितले.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
बिपीन कोल्हे म्हणाले, की ग्रामपंचायतीत निवडून आलेल्या सरपंच व सदस्यांनी गावाच्या विकासावर प्रामुख्याने भर द्यावा. ब्राम्हणगाव, चांदेकसारे येथे नव्याने वीज उपकेंद्रं प्रस्तावित आहेत. गावच्या समस्या सांगा, त्याचा आराखडा तयार करा, नवोदित सरपंचांना जेथे आवश्यक असेल, तेथे सहकार्य करू, अशी ग्वाही दिली.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.