महालक्ष्मी मल्टिस्टेट’कडून कोट्यवधींच्या ठेवी हडप.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :मोठा गाजावाजा करून सुरू केलेल्या महालक्ष्मी मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीकडून अनेक वर्षांपासून ठेवीदारांना ठेवींची मुदत संपूनही पैसे देण्यास टाळाटाळ केली जात होती. या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आर्थिक घोटाळे करून सोसायटी बुडविली, तसेच ठेवीदारांचे पैसे देण्याचे टाळून एक-एक करून सर्व शाखा बंद केल्यामुळे ठेवीदारांची मोठी फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. अनेकदा मागणी करूनही पैसे देण्यास टाळण्यात येत असल्याने अखेर ठेवीदारांनी जिल्हा पोलीसप्रमुख रंजनकुमार शर्मा यांना याबाबत तक्रारीचे निवेदन दिले आहे.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
महालक्ष्मी मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीमध्ये मोठ्या विश्‍वासाने अनेक ठेवीदारांनी मोठ्या रकमांच्या ठेवी ठेवल्या आहेत. ठेवींची मुदत संपूनही ठेवीदारांना तारीख पे तारीख देऊन पैसे देण्याचे टाळण्यात आले. काही ठेवीदारांना स्टॅम्पपेपरवर हमीपत्र लिहून दिले तसेच अनेकांना दिलेले चेकही न वटताच परत आल्यामुळे संचालकांनी ठेवीदारांची मोठी फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. महालक्ष्मी मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीची नगरमध्ये गुलमोहर रोड येथे मुख्य शाखा होती. आडतेबाजार, झोपडी कॅंटीन, सावेडी अशा अनेक शाखा होत्या. या सर्व शाखा एक-एक करून मल्टिस्टेट को-ऑप सोसायटीच्या चेअरमन हेमलता सुपेकर यांनी बंद केल्या.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
मोठ्या विश्‍वासाने ठेवलेल्या कष्टाच्या पैशांवर चेअरमन व पदाधिकाऱ्यांनी गडांतर आणले आहे. त्यांच्यावर विश्‍वास ठेवून अनेक ठेवीदारांनी या मल्टिस्टेट सोसायटीमध्ये आपले पैसे ठेवले. परंतु, त्यांचा विश्‍वासघात करण्यात आला आहे. चेअरमन हेमा सुपेकर यांचे दीर ज्ञानेश्‍वर सुपेकर, पुतण्या शैलेंद्र सुपेकर, कर्मचारी कमलेश पाडळकर व रोहित बच्छावत या व्यक्तींनी ठेवीदारांची अनेक वर्षे दिशाभूल केली आहे. ठेवीदारांचे कोट्यवधी रुपये महालक्ष्मी मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीमध्ये अडकले आहेत. फसविल्या गेलेल्या ठेवीदारांनी अखेर जिल्हा पोलीसप्रमुख रंजनकुमार शर्मा यांची भेट घेऊन त्यांच्याकडे याबाबत तक्रारीचे निवेदन दिले असून, त्यांनी यावर चर्चा झाल्यानंतर त्वरित कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.