पारनेरच्या विद्यार्थीनीची वाढदिवशीच आत्महत्या!.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागात शिकणाऱ्या रेश्मा गायकवाडचा सोमवारी वाढदिवस होता. तिच्या मैत्रिणींनी रविवारी मध्यरात्री जल्लोषात वाढदिवस साजरा केला खरा, परंतु रेश्माच्या मनात काय चालले आहे हे कोणालाही कळले नाही. दुसऱ्या दिवशी दुपारच्या सुमारास तिच्या आत्महत्येची बातमी आली आणि सर्वांनाच धक्का बसला.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
रेश्मा एम.एस्सी. द्वितीय वर्गात शिकत होती. ती मूळची अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील रहिवासी. तिच्या आत्महत्येनंतर विद्यापीठात खळबळ उडाली. वनस्पतीशास्त्र विभागातही शांतता पसरली होती. तिच्यासोबत राहणाऱ्या मैत्रिणींना या घटनेनंतर तातडीने अन्य वसतिगृहात हलविण्यात आले. अतिशय शांत आणि मनमिळाऊ स्वभावाची रेश्मा आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलेल याची कुणालाही कल्पना नव्हती.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
याबाबत रेश्माच्या शिक्षिका म्हणाल्या, 'रेश्मा अभ्यासात हुशार होती. ग्रामीण भागातून उच्च शिक्षण घेण्यासाठी तिने विद्यापीठात प्रवेश घेतला. तिचे आई-वडील शेतकरी आहेत. शनिवारी एम.एस्सी. द्वितीय शाखेच्या तिसऱ्या सत्राचा निकाल जाहीर झाला. या निकालात ती सर्व विषयांत उत्तीर्ण झाली. वर्गात तिचे कुणाशीही भांडण नव्हते. ती इतके टोकाचे पाऊल उचलेल, असे कोणालाही वाटले नाही. दरम्यान, ही घटना समजताच कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, उपकुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी यांनी घटनास्थळाची पाहणी केली.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.