दुसर्याचे मुल चोरून आई-बाप बनण्याचे स्वप्न पाहणा-या दाम्पत्याला अटक.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :स्वताला मुल होत नसल्याने शेजारचे नवजात मूल चोरून आई-बाप बनण्याचे स्वप्न पाहणा-या दाम्पत्याला शिर्डी पोलिसांनी मुंबईतून अटक केली.शिर्डीत बाबर व गोंडगिरे हे कुटूंब एकमेकांचे चांगले शेजारी होते. दोन्हीही कुटूंबे साईबाबांच्या मुर्त्या विकून चरितार्थ चालवत.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.g
----------------------------------
संजीव हरीभाऊ गोंडगिरे यांना एक साडेतीन वर्षाची मुलगी आहे. त्यांना नुकताच एक मुलगा झाला. ३ जानेवारी रोजी गोंडगिरे यांचे शेजारी असलेल्या सुरेश बाबर व पुजा बाबर यांनी गोंडगिरे यांचा पाच वर्षाचा मुलगा चोरुन शिर्डीतून पलायन केले. आपलं मुल म्हणून याला वाढवू व कोठेही काम करून चरितार्थ चालवू या कल्पनेने या दाम्पत्याने चेंबूर गाठले होते.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
....आणि अकरा दिवसांचे मातृत्वही संपुष्टात !
दरम्यान संजीव गोंडगिरे यांच्या फिर्यादीवरून शोध करत शिर्डी पोलीस पथकाने बाबर दाम्पत्याला मुलासह काल ताब्यात घेतले. यामुळे पुजा बाबर यांचा आई होण्याचा आनंद क्षणिक ठरला. आणि अकरा दिवसांचे त्यांचे मातृत्वही संपुष्टात आले. आरोपी व बाळाला शिर्डीत आणण्यात आले असून आरोपींची रवानगी कोठडीत करण्यात आली. तर बालकाला त्याच्या आईकडे सोपविण्यात आल्याचे इंगळे यांनी सांगितले. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.