कोपरगावात ५ दुचाकी रॉकेल टाकून जाळल्या.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :अज्ञात व्यक्तींनी रविवारी मध्यरात्रीनंतर कोपरगाव शहरातील शारदानगरमध्ये अशोक कचरू टेंबरे यांच्या घराच्या आवारात लावलेल्या 5 दुचाकी रॉकेल टाकून जाळल्या. या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
शारदानगरमध्ये अशोक टेंबरे यांचा बंगला असून येथेच करणीदान चरण हे भाडेकरू म्हणून राहतात. रविवारी रात्री टेंबरे व चरण हे नियमितपणे आपल्या दुचाकी बंगल्याच्या आवारात लावून झोपले. दरम्यान, मध्यरात्रीनंतर अचानक आग व धुराचे लोळ निघून स्फोट झाल्याचा आवाज येऊ लागल्याने टेंबरे यांनी घराचा दरवाजा उघडून बघितले असता दुचाकी जळत असल्याचे दिसले.आरडाओरड झाल्यावर आसपासच्या नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. अखेर नगरपालिकेच्या अग्निशामक दलास पाचारण करून रात्री उशिरा आग आटोक्‍यात आणण्यात आली. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
आगीत टेंबरे यांच्या मालकीच्या टीव्हीएस स्टार (क्रमांक एम.एच.17, एक्‍स. 8403), पॅशन प्रो (क्रमांक एम.एच.17, ए.के.9439), स्कुटी (क्रमांक एम.एच.17, वाय. 2719), हिरो मोटो (क्रमांक एम.एच.15,सी.एक्‍स.5417) तर, चरण यांच्या मालकीची हिरो पॅशन (क्रमांक एम.एच.17, व्ही.यु.1753) या दुचाकी जळून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.