40 लाखांच्या पथदिवे अपहारप्रकरणी फिर्यादीची घंटा बांधणार कोण ?

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  अहमदनगर महापालिकेतील 40 लाखांच्या अपहार प्रकरणातील वादग्रस्त पथदिव्यांचा प्रकाश या गैरव्यवहारावर अजून पडेना, पर्यायाने पालिकेतील “दिव्याखालचा अंधार’ दूर होईना. काही तरी जुगाड होऊन हे सर्व थांबावे, अशीच या प्रकरणी चौकशीची देहबोली दिसत आहे. प्रकरण धाडसाने पुढे नेण्याची घाई कुणालाच नाही. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
दरम्यान, फिर्याद देण्यासाठी अधिकाऱ्याचा “शोध’ सुरू आहे. त्यामुळे मुख्य फिर्यादीची घंटा पोलिसांच्या दप्तरी कोणी बांधायची हेच ठरविण्याचा खल सुरू आहे.एकूणच या प्रकरणात काही तरी होईल अशी वाट पाहत वेळकाढूपणा सुरू आहे. अन्यथा आतापर्यंत यातील दोषींची नावे जाहीर होऊन फिर्यादही दाखल झाली असती. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
या प्रकरणात कामांची नोंदच रजिस्टरला नसताना कामे होणे, कथितरीत्या दोन रजिस्टर किंवा मूळ रजिस्टरची नोंद असलेली पाने फाडली जाणे, मंजुरी नसताना व कामे न होता देयक अदा होणे, आदी विषयांदरम्यान विविध टप्प्यांवरील जबाबदार अधिकाऱ्यांची भूमिका काय होती याचा अभ्यास सध्या पालिकेत सुरू आहे. हा अभ्यास आणखी किती काळ चालेल हे स्पष्ट नाही. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.