मुलींचा घटता जन्मदर हा चिंतेचा विषय - महापौर सुरेखा कदम

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :मुलींचा घटता जन्मदर हा चिंतेचा विषय बनला आहे. सगळ्याच क्षेत्रात मुली आघाडीवर असताना स्त्रीभ्रूण हत्येसारखे पाप समाजात घडत आहे. शिवबाला जन्म देणारी व घडवणारी ही एक स्त्रीच होती. मुलगा मुलगी भेद न मानता घरोघरी मुलींच्या जन्माचे स्वागत झाले पाहिजे. मुलगी वाचवा... मुलगी शिकवा अभियानांतर्गत मुलींच्या नांवे दोन हजाराची ठेव ठेवली जात असल्याचे प्रतिपादन महापौर सुरेखा कदम यांनी केले.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
लायनेस क्लब ऑफ अहमदनगर मिडटाऊनच्या वतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त दुर्गादेवी अमरचंद नय्यर शाळेत आयोजित युवा दिन कार्यक्रमात कदम बोलत होत्या. यावेळी क्लबच्या अध्यक्षा लतिका पवार, छाया राजपूत, सुरेखा कडूस, संध्या पवार, शर्मिला कदम, प्राथ. मुख्यध्यापक श्रीकृष्ण पवार, माध्यमिकच्या मुख्यध्यापिका मंदा हंडे आदिंसह विद्यार्थी, पालक व शिक्षक उपस्थित होते.

पुढे कदम म्हणाल्या की, फास्टफुडच्या जमान्यात विद्यार्थ्यांमध्ये अनेक व्याधी निर्माण होत आहे. यासाठी सकस आहाराची आवश्यकता असून, यासाठी पालकांमध्ये जागृती आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.प्रारंभी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस अभिवादन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. जिल्हा रुग्णालयाचे समुपदेशन अधिकारी शर्मिला म्हस्के-कदम यांनी विद्यार्थ्यांना संतुलित आहार व आरोग्या विषयी मार्गदर्शन केले. तसेच यावेळी उपस्थित विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यात आले. मंदा हंडे यांनी लायनेसच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचे कौतुक केले.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
लतिका पवार म्हणाल्या की, समाजातील प्रत्येक आई आपल्या मुलांचे जीवन घडविणारी शिल्पकार आहे. तर शिक्षक विद्यार्थ्यांसाठी दिशादर्शक असतात. प्रत्येक आईमध्ये राजमाता जीजाऊंचे वात्सल्य व मार्गदर्शक दडलेला असून, प्रत्येक आईने जीजाऊंची भुमिका पार पाडल्यास सुसंस्कारीत पिढी घडणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन मीना जगताप यांनी केले. आभार पुष्पा म्हस्के यांनी मानले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.