श्रीगोंदा तालुक्यातून अल्पवयीन मुलीचे अपहरण.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी कोठार येथील दहावी इयत्तेत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचे गुरूवार दि.११ रोजी कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची घटना घडली आहे.याबाबत मुलीच्या वडिलांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तींविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील बेलवंडी कोठार येथील शेतकरी कुटुंबातील एक मुलगी भानगाव येथे दहावीच्या वर्गात शिक्षण घेते आहे. नेहमीप्रमाणे गुरूवार दि.११ रोजी संबंधित मुलगी तिची सायकल घेऊन सकाळी साडेसात वाजता भानगाव येथे शाळेत गेली. दुपारी साडेबारा वाजता शाळा सुटून ती पुन्हा घरी जाण्यासाठी निघाली, परंतु नेहमीच्या वेळेत ती घरी न पोहोचल्यामुळे तिच्या घरच्यांनी तिची शोधाशोध केली.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
यावेळी गावातील एका व्यक्तीच्या घरासमोर तिची सायकल आढळून आली. त्यामुळे त्या व्यक्तीकडे सदर मुलीबाबत कुटुंबीयांनी अधिक चौकशी केली असता, त्या व्यक्तीने तुमची मुलगी सकाळी याठिकाणी सायकल लावून निघून गेल्याचे त्या व्यक्तीने सांगितले. त्यानंतर मुलीच्या घरच्यांनी तिचा सर्वत्र शोध घेतला असता ती कुठेही न सापडल्यामुळे आज शुक्रवार दि.१२ रोजी मुलीच्या वडिलांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात येऊन फिर्याद दिली आहे. 

त्यावरून अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, याबाबत पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक नीलेश कांबळे हे करीत आहेत. दरम्यान शहरासह ग्रामीण भागातही शाळेत जाणारे विद्यार्थी सुरक्षीत नसल्याचे या प्रकारावरून समोर आले आहे.त्यामुळे पालकांसाठी ही बाब निचितच चिंतेची आहे. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.