५४ ग्रामपंचायत सदस्याचे सदस्यत्व रद्द.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :कर्जत तालुक्यातील ५४ ग्रामपंचायत सदस्याचे सदस्यत्व रद्द झाले आहे. तर एक पद रिक्त असून, या जागेवर नव्याने सदस्याची निवड कधी होते, याकडे सर्वाचे लागले असले आहे.तालुक्यात ९१ ग्रामपंचायती असून ८२० एवढे सदस्य आहेत. यातील २९ ग्रामपंचायतीतील ५४ जणांचे सदस्यत्व रद्द झाले आहे. यात नांदगावच्या ९ पैकी ६ सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाले आहे. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
यातील २ दोघांनी जात प्रमाणपत्र मुदतीत सादर केले नाही. तर ४ जणांनी निवडणूक खर्च मुदतीत सादर केला नाही. त्यामुळे या ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्त करावा लागत आहे. चापडगाव व राक्षसवाडी बु येथील प्रत्येकी ४ सदस्य, तीखी, थेरगाव, सिद्धटेक, येथील प्रत्येकी ३ सदस्य्. बेलगाव, मांदळी, कोकणगाव, निमगाव डाकू, खंडाळा, लोणी मसदपूर, खातगाव, आंबीजळगाव येथील प्रत्येकी २ तर निमगाव गांगर्डा, नागमठाण, कोंभळी, रातंजन, सुपे, दिघी, माही, चांदे बु. चांदे खु,रेहेकुरी, वडगाव तनपुरा, बारडगाव द, तळवडी, आखोनी, व शिम्पोरा येथील प्रत्येकी एक सदस्याचे सदस्यत्व रद्द झाले आहे.

तालुक्यातील निमगाव गांगर्डा येथील बाबासाहेब गांगर्डे व चापडगाव येथील सौ ज्योती प्रकाश शिंदे यांची पंचायत समितीचे सदस्य म्हणून निवड झाली आहे. मांदळी, माही व लोणी मसदपूर येथील प्रत्येकी एक असे तीन सदस्य मयत झाले आहेत. अतिक्रमण केल्याच्या कारणावरून कोंभळी येथील एक तर सिद्धटेक येथील तिघांचे सदस्यत्व रद्द झाले आहे. यातील दोन सदस्यांनी आपले पद भरण्यास न्यायालयातून स्थगिती मिळविली आहे.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
खातगाव येथील एक सदस्यांना तीन अपत्य तर खंडाळा येथील दोन सदस्यांचे दोन पेक्षा जास्त अपत्य असल्याने सदस्यत्व रद्द झाले आहे. खातगाव येथील एका सदस्याने बोगस जात प्रमाणपत्र सादर केल्याने सदस्यत्व रद्द झाले. तालुक्यातील ७ जणांनी आपल्या निवडणुकीचा खर्च मुदतीत सादर न केल्यानेही त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. तर सर्वात जास्त ३४ सदस्यांनी आपले जात प्रमाणपत्र मुदतीत सादर न केल्याने आपले सदस्यत्व गमावले आहे.

कर्जत तालुक्यातील दोन सदस्य पंचायत समिती सदस्य तर मिरजगावचे सदस्य गुलाब तनपुरे हे जिल्हा परिषद सदस्य झाले आहेत. यातील अनेकांचे सदस्यत्व २०१६ मध्ये रद्द झाले आहे. तर काही २०१७ मध्ये रद्द झाले आहेत. या सदस्यातील विभागीय आयुक्ताकडे वा न्यायालयाकडून कोणत्याही स्वरूपाची स्थगिती मिळविलेली नसल्याची माहिती पंचायत समितीकडून मिळाली. 

खंडाळा येथे शौचालय नसल्याने रद्द झाले होते. एखादे पद रद्द झाले तर त्या जागेवर सहा महिन्याच्या आत निवडणूक घेऊन नवीन सदस्य निवडून आला पाहिजे कर्जत तालुक्यात मात्र एक वर्ष पद रिक्त राहून ही अद्याप फेर निवडणुका न लागल्याने यामागील नेमके गौडबंगाल कळायला मार्ग नाही.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.