लोकसभेच्या निवडणुकीसाठी डॉ. सुजय विखेंची मोर्चेबांधणी सुरू.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :पक्ष कोणता हे निश्‍चित नसले तरी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचे सुपुत्र व पद्‌मश्री विखे कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे यांनी आता खऱ्या अर्थाने लोकसभेच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. विळद येथील मेडिकल महाविद्यालयाच्या परिसरात आज दिवसभर दक्षिणेतील विखे समर्थकांबरोबर तालुकानिहाय स्वतंत्र चर्चा झाली. या चर्चेत उमेदवारीबाबत चाचपणी करून निवडणूक कामाला लागण्याचे निर्देशदेखील देण्यात आले. स्वतः डॉ. सुजय विखे यांनी तालुकानिहाय प्रमुख कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करून त्यांची मते जाणून घेतली.


----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
दक्षिण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याचे यापूर्वी डॉ. विखे यांनी गणेश कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत जाहीर केले होते. अर्थात, डॉ. विखे लोकसभा लढविणार असल्याची चर्चा होती. पण, त्यांनी गेल्या दोन महिन्यांपूर्वी स्पष्ट भूमिकाच जाहीर केली. अर्थात, पक्ष कोणता हे मात्र निश्‍चित झाले नसले तरी उमेदवारी मात्र निश्‍चित असल्याचे त्यांनी सांगितले आहे. 

त्यानुसार डॉ. विखे यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्याच पार्श्‍वभूमीवर आज विळद येथे दक्षिणेतील विखे समर्थकांची तालुकानिहाय चर्चा करण्यात आली. स्वतंत्रपणे तालुक्‍यातील कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करून त्यांची मते जाणून घेतली. विशेष म्हणजे पद्‌मभूषण बाळासाहेब विखे यांना मानणारे कार्यकर्ते, तसेच ना. राधाकृष्ण विखे यांना मानणारे कार्यकर्ते असा जुन्या-नव्याचा मेळ या चाचपणीत घालण्यात आला होता.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
जुन्या कार्यकर्त्यांकडून तालुक्‍याची राजकीय माहिती घेण्यात आली. तसेच, नव्याने कार्यकर्ते जोडण्याबाबतही नियोजन यावेळी करण्यात आले. दक्षिणेतील नगर शहर व नगर तालुका वगळून आज अन्य तालुक्‍यांतील ठरावीक कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यात आली. प्रत्येक तालुक्‍यातील कार्यकर्त्यांबरोबर बंद खोलीत डॉ. विखे यांनी चर्चा केली. लोकसभा निवडणूक कोणत्याही परिस्थितीत लढणार असून सर्वांनी त्या दृष्टीने कामाला लागण्याचे आवाहन डॉ. विखे यांनी केले. यासाठी आवश्‍यक ती यंत्रणा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.