नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीचाच - माजी मंत्री दिलीप वळसे.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  येत्या २०१९ मध्ये श्रीगोंदा विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार राहुल जगतापच असणार यात कोणतीही शंका नाही. त्यामुळे त्यावर चर्चा देखील करण्याची गरज नाही. परंतु नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीचाच असून, पक्षाध्यक्ष शरद पवार देतील. तो उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांची असल्याचे मत माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी काल श्रीगोंद्यात व्यक्त केले.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
श्रीगोंदा तालुक्यातील पिंपळगाव पिसा येथील कुकडी कारखान्यावर आयोजित केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी बोलताना वळसे म्हणाले की, भाजपचा उमेदवार हा कधीच एकटा नसतो. त्याच्या प्रचारासाठी आरएसएस, विश्वहिंदू परिषद अशा विविध १० ते १२ संघटनांचे कार्यकर्ते हे भाजप उमेदवाराला निवडून आणण्यासाठी राबत असतात.

गुजरात निवडणूक निकाल हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आत्मपरीक्षण करायला लावणारा आहे. तसेच भीमाकोरेगाव दंगलीमागे हिंदुत्ववादी संघटनांचा हात असल्याचे पक्षनेते शरद पवार यांनी सांगितले होते. परंतु त्या वक्तव्याचा विपर्यास करत, पवार हे मराठाविरोधी असल्याचे प्रचार सध्या विरोधक करत असून, ते चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच नुसते कारखान्यावर किंवा संस्थेत बसून चालणार नाही तर लोकांमध्ये जाऊन चर्चा करण्याचा गावागावात सभा घेण्याचा वक्ते तयार करण्याचा, सल्ला वळसे पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिला.

तसेच या सरकारने दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला असून, कोपरडी व भीमाकोरेगाव प्रकरणावरून सरकारबद्दल जनतेच्या मनात राग असल्याचे वळसे यांनी सांगितले. तोच असंतोष व राग याचे भांडवल करून त्याचे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मतात परिवर्तन करावे असा सल्लाही त्यांनी दिला. तसेच शरद पवार यांचे श्रीगोंद्यावर विशेष प्रेम असल्याचे सांगितले.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------

यावेळी बोलताना आ.जगताप यांनी येत्या विधानसभा लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराला जिल्ह्यात सर्वात जास्त मते ही श्रीगोंदा तालुक्यात मिळतील असेही सांगितले. तसेच केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे साखर कारखाने अडचणीत आल्याची टीका त्यांनी केली. तसेच तालुक्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वात जास्त मते ही राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मिळाल्याचे त्यांनी सांगितले. 

तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने माजी मंत्री बबनराव पाचपुते यांना विविध पदावर काम करण्याची संधी दिली, तरी ते पक्ष सोडून गेले. त्याचा सर्वाधिक आनंद मला झाला असून, त्यामुळेच मला शरद पवारांचे नेतृत्व लाभले असा टोला त्यांनी पाचपुते यांना लगावला. तसेच भाजपचे श्रीगोंदा तालुकाध्यक्ष कुकडी कारखान्याबाबत बाहेर खोट्या गोष्टी पसरवत असून, पाचपुते हे त्यांचे बोलावते धनी आहेत. 

परंतु असे खोटे आरोप केल्याबद्दल आपण पाचपुते यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकून त्यांना तुरुंगात पाठवायलाही मागेपुढे पाहणार नसल्याचे आ.जगताप यांनी सांगून, पाचपुतेंनी कुकडी कारखाण्यावर केलेले आरोप सिद्ध झाल्यास दोन्ही पदांचा राजीनामा देऊन पाचपुतेंचा कार्यकर्ता बनून राहीन असेही त्यांनी ठणकावून सांगितल.

या मेळाव्यासाठी अविनाश आदिक, दादाभाऊ कळमकर, सचिन जगताप, तालुकाध्यक्ष हरिदास शिर्के, नगरसेवक अकतार शेख, दत्ता पानसरे यांच्यासह नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन विष्णुपंत जठार यांनी केले. तसेच माजी मंत्री पाचपुते यांचे एकेकाळचे विश्वासू सहकारी परंतु जिल्हा परिषद निवडणुकीपासून त्यांच्यापासून दुरावलेले काष्टी सोसायटीचे नवनियुक्त अध्यक्ष विठ्ठलराव काकडे यांनी देखील या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.