युवकांना विवेकानंदांच्या विचारांची तर जिजाऊंच्या आदर्शाची गरज -प्रा.माणिक विधाते

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :राजमाता जिजाऊंच्या प्रेरणेने छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची मुहुर्तमेढ रोवली. तर युवकांना प्रेरणा देवून स्वामी विवेकानंदांनी नव भारताचा पाया रचला. देशातील युवकांना स्वामी विवेकानंद यांनी दिशा दिली. युवकांचा देश असलेल्या भारताला आज खर्‍या अर्थाने स्वामी विवेकानंद यांच्या विचारांची तर जिजाऊंच्या आदर्शाची गरज असल्याची भावना राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते यांनी व्यक्त केली.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊंच्या जयंती निमित्त राष्ट्रवादीच्या वतीने आयोजित अभिवादन कार्यक्रमात प्रा.विधाते बोलत होते. शनी चौक येथील स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्यास तसेच अहमदनगर ऐतिहासिक वास्तूसंग्रहालय येथील राजमाता जिजाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात आले.

यावेळी संजय झिंजे, दीपक सुळ, प्रकाश भागानगरे, बापू पोतदार, कुमार नवले, सुरेश आडसुळ, अरुण खिची, भरत गारुडकर, दतात्रय राऊत, प्रा.बबन गाडेकर, फारुक रंगरेज, सागर शिंदे, अ‍ॅड.प्रशांत नेमाणे, प्रशांत घलपे, अभिजीत सपकाळ, संध्या मेढे, बहिरनाथ वाकळे, सुरेश भालेराव, राजू शेख आदि उपस्थित होते.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
पुढे प्रा.विधाते म्हणाले की, युवकांच्या माध्यमातून समाजात बदल घडणार आहे. यासाठी राष्ट्रवादीत युवकांना संधी देण्याचे कार्य चालू असून, आ.संग्राम जगताप, आ.अरुणकाका जगताप व माजी आ.दादाभाऊ कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली या अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.