शार्प शुटर सचिन दोडकरला शिर्डी पोलीसांनी सापळा रचून केली अटक.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :शिर्डी येथील महेश बोऱ्हाडे याच्यावर अस्तगाव माथ्यावर गोळीबार करून फरार झालेला शार्प शुटर सचिन दोडकर यास शिर्डी पोलीस पथकाने सापळा रचून बुधवारी रात्री जेरबंद केले. त्याच्याकडून गावठी कट्टा व तीन जिवंत काडतूस शिर्डी पोलिसांनी हस्तगत केली.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
याबाबत शिर्डी पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, बुुधवार, दि. 10 जानेवारी रोजी पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, अतिरिक्‍त पोलीस अधीक्षक रोहिदास पवार उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर पाटील, पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप काहळे, पो. ना. बैसाने, चव्हाण, किरण कुऱ्हे, नितीन शेलार यांच्या पथकास गुप्त खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार एक इसम रुई शिवारातील निवारा हौसिंग सोसायटीजवळ पिंपळवाडी रस्त्याला येणार असल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार शिर्डी पोलिसांनी दोन पंचांच्या साहाय्याने सापळा रचला. त्या ठिकाणी काही वेळाने एक इसम आला. त्याच्या संशयित हालचाली नजरेस पडल्याने त्यास पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची झाडाझडती घेतली असता त्याच्याकडे देशी बनावटीचे मागेझीन पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे मिळून आली.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
त्यास शिर्डी पोलीस ठाण्यात आणून अधिक विचारपूस केली असता तो श्रीरामपूर येथील सचिन दिलीप दोडकर असून त्याच्यावर श्रीरामपूर, राहाता पोलिसांत अनेक प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. अस्तगाव माथ्यावर गोळीबार करून फरार झालेला होता. या प्रकरणी राहाता पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत शिर्डी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक कहाळे करत आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.