पथदिवे बोगस बिल प्रकरनी 'त्या' सहा अधिकाऱ्यांवर कारवाई?

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :पथदिवे बोगस बिल प्रकरण मनपाचा विद्युत विभाग, बांधकाम विभाग, लेखा विभाग व लेखा परीक्षण विभाग अशा चार विभागांशी संबंधित असल्याने या विभागांशी संबंधित अधिकारी उपायुक्त विक्रम दराडे, लेखाधिकारी दिलीप झिरपे, लेखा परीक्षक चंद्रकांत खरात, शहर अभियंता विलास सोनटक्के तसेच उपशहर अभियंता व विद्युत विभाग प्रमुख रोहिदास सातपुते व विद्युत पर्यवेक्षक बाळासाहेब सावळे या सहा अधिकाऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. 


----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
चौकशी समितीने या सहाही अधिकाऱ्यांचे जबाब घेतले असले तरी उपलब्ध कागदपत्रांच्या तपासणीनंतर अंतिम निष्कर्षही मांडले आहेत. या निष्कर्षात पथदिव्यांच्या संबंधित प्रकरणात गंभीर अनियमितता व महापालिकेची आर्थिक फसवणूक व नुकसान झाल्याचे स्पष्ट नमूद केले असल्याने या सहाही अधिकाऱ्यांचा या अनियमिततेत व मनपाच्या आर्थिक नुकसानीत प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध स्पष्ट झाला आहे. त्यामुळे कारवाईच्या कृती आराखड्यात या सर्वांवर काय कारवाई होते, तसेच त्यांच्या कार्यालयीन कामकाजात काय सुधारणा सुचवल्या जातात, याची उत्सुकता वाढली आहे.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
मनपातील गैरव्यवहारावर अखेर शिक्कामोर्तब.
शहरातील प्रभाग १ व २८ मध्ये पथदिव्यांच्या कामात अनियमितता असून महापालिकेची आर्थिक फसवणूक झाल्याचे सिद्ध झाले आहे. चौकशीचा २२ पानांचा अहवाल उघडल्यानंतर गुरुवारी आयुक्त घनश्याम मंगळे यांनी तसे स्पष्ट केले, पण दोषींची नावे गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत. सोमवारी अहवालाचे अवलोकन करून सविस्तर माहिती देण्याची तयारी प्रशासनाने केली आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.